IND VS PAK Asia Cup 2025 x
Sports

IND VS PAK : हँडशेक ड्रामा, आशिया कपवर बहिष्कार, आधी नकार मग होकार; भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पुन्हा ड्रामा होणार?

IND VS PAK Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. हा महामुकाबला रविवारी २१ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

Yash Shirke

IND VS PAK : दिनांक १४ सप्टेंबर २०२५... वार रविवार... आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले... पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने टॉस जिंकला. पाकिस्तानच्या कर्णधाराने भारतीय संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. पहिल्या डावात पाकिस्तानच्या फलंदाजांवर भारतीय गोलंदाज तुटून पडले. साहिबजादा फरहान आणि शाहीन आफ्रिदी यांनी चांगली खेळी केली. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. हा सामना भारताने सहज जिंकला. पण सामन्यानंतर खरा खेळ सुरु झाला.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर क्रेजवर असलेले सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे दोघे मैदानातून थेट बाहेर पडले. पाकिस्तानचे खेळाडू सामन्यानंतर हँडशेक करण्यासाठी थांबले होते. पण हात तर सोडा, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघाकडे वळूनही पाहिले नाही. सूर्या आणि दुबे दोघे मैदानातून ड्रेसिंग रुममध्ये गेले. गौतम गंभीरसह अन्य खेळाडू त्यांची वाट पाहत होते. दोघे आत गेल्यानंतर हर्षित राणाने पाकिस्तानच्या तोंडावर दार बंद केले. टीम इंडियाने पाकिस्तान संघाशी हँडशेक करणे टाळल्यावरुन स्टेडियमबाहेर नवा वाद सुरु झाला.

भारतीय संघाने हँडशेक न केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे अधिकृत तक्रार केली. त्यांनी आयसीसीच्या आचारसंहिता आणि एमसीसी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना सध्याच्या स्पर्धेतून तातडीने काढून टाकण्याची मागणी केली. आयसीसीने पाकिस्तानची ही मागणी फेटाळली. यामुळे जगासमोर पाकिस्तानची फजिती झाली. पण पुढे होणारा प्रकार त्याहूनही जास्त हास्यास्पद होता.

हँडशेक वादानंतर पाकिस्तानच्या संघाने आशिया कप २०२५ वर बहिष्कार घालू अशी धमकी दिली. मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी मान्य न केल्याने पाकिस्तानने स्पर्धेबाहेर पडण्याचा, वॉकओव्हर करण्याचा निर्णय घेतला. पण आयसीसीमुळे पाकिस्तानला हा निर्णय मागे घ्यावा लागला. वॉकओव्हरची घोषणा करुन परत सामना खेळण्यासाठी आल्याने पाकिस्तानचे सर्वांसमोर नाचक्की झाली. हँडशेक प्रकरण, आशिया कपवर बहिष्कार या संपूर्ण प्रकरणाची, संपूर्ण ड्रामाची सुरुवात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापासून झाली आहे. आता पुन्हा एकदा २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. आता कोणता नवीन ड्रामा सुरु होईल, पाकिस्तान कशा प्रकारे स्वत:ची लाज काढून घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय नागरिकांना मारले. याचा वचपा भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची ठाणी नष्ट केली. पाकिस्तानने ड्रोनच्या मार्फत भ्याड हल्ले केले, पण भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये अशी मागणी झाली होती. पण आयसीसीच्या नियमांमुळे भारताला खेळावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT