Ind Vs Pak Asia Cup 2025 Jasprit Bumrah x
Sports

IND vs PAK : पाकिस्तानचा सुपर फलंदाज 'सुपर फ्लॉप'! बुमराहला 6 षटकार मारणार होता पण पहिल्या चेंडूवर पडली विकेट, पाहा Video

IND vs PAK Asia Cup 2025 : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानचा सैम अयुब पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

Yash Shirke

  • आशिया कप सामन्यात पाकिस्तानचा सैम अयुब पहिल्याच चेंडूवर बाद.

  • हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर बुमराहने झेल पकडला.

  • सलग दुसऱ्या डावात सैम अयुब गोल्डन डकवर बाद झाला.

Asia Cup 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईत खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पाकिस्तानचा सैम अयुब हा गोल्डन डकचा बळी ठरला. सामन्याच्या पहिल्या अधिकृत चेंडूवर शून्यावर सैम अयुबला हार्दिक पंड्याने बाद केले. तो ओमानविरुद्धच्या सामन्यातही पहिल्या चेंडूवर बाद झाला होता.

भारताकडून हार्दिक पंड्या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिला चेंडू वाइड म्हणून गेला. दुसऱ्या चेंडूवर ऑफ-स्टंपच्या बाहेर आउटस्विंग टाकला. सैम अयुबने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट जसप्रीत बुमराहच्या हातात गेला आणि सैम अयुब हा आजच्या पहिल्या अधिकृत चेंडूवर बाद झाला.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सलग डावात गोल्डन डकचा बळी ठरलेल्या खेळाडूंच्या यादीत सैम अयुबचे नाव जोडले गेले आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होण्याचा विक्रम पाकिस्तानच्या अब्दुल्ला शफीकच्या नावावर आहे, जो सलग चार वेळा टी-२० डावात गोल्डन डकवर बाद झाला होता.

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू तनवीर अहमदने सैम अयुबबाबत एक भाकित केले होते. सैम अयुब हा आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराहला एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारु शकतो, असे तनवीर अहमद म्हणाला होता. पण सैम अयुबला बुमराहचा सामना करण्याची संधीही मिळाली नाही. त्याने दोन चेंडू खेळत शून्य धावा केल्या. आशिया कपमध्ये तो दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT