IND Vs PAK Asia Cup 2025  x
Sports

IND Vs PAK : पाकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी टीम इंडियाचा प्लान ठरला, स्टार खेळाडूंची होणार एन्ट्री; अशी असेल Playing XI

IND Vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सुपर ४ मधील सामना आज (२१ सप्टेंबर) दुबईत खेळला जाणार आहे. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Yash Shirke

  • आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाक आमनेसामने येणार.

  • हा सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार.

  • संजू सॅमरन-हार्दिक पंड्या यांच्याकडे विक्रमाची संधी.

Asia Cup 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. हा सुपर फोर सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज (२१ सप्टेंबर) खेळला जाणार आहे. मागच्या रविवारी १४ सप्टेंबर रोजी आशिया कपमध्ये या दोन संघांमध्ये लढत झाली होती. तेव्हा भारतीय संघाने सात गडी राखत पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता.

पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ ओमानविरुद्धचा सामना जिंकला होता. या सामन्यामध्ये भारताच्या प्लेईंग ११ मध्ये दोन बदल करण्यात आले होते. जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्ती यांना विश्रांती देत अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा या दोघांना संधी देण्यात आली होती. आता प्लेईंग ११ मध्ये कोणाला सामील केले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या बाजूला, भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल करण्यात आला होता. ओमानविरुद्ध हरिस रौफ आणि खुशदिल शाह यांना संघात सामील करण्यात आले. सुफियान मुकीम, फहीम अश्रफ यांना वगळण्यात आले होते.

भारताची संभाव्य प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती.

पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग ११ -

साहिबजादा फरहान, सैम अयुब, फखर जमान, सलमान अली आगा (कर्णधार), हसन नवाज, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हारिफ रौफ, अबरार अहमद.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. एकूण १४ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये ११ सामने भारताने जिंकले आहेत. उरलेल्या ३ सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला. आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या यांच्यावर नजर असणार आहे. जर संजूने या सामन्यात ८३ धावा केल्या, तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा १२ भारतीय फलंदाज बनेल. दुसऱ्या बाजूला हार्दिकने जर ४ विकेट्स घेतल्या, तर तो १०० विकेट्सचा पल्ला गाठेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा, २४ तास पोलीस तैनात राहणार, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Accident: भरधाव डंपरची दुचाकीसह १७ वाहनांना धडक; १९ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही VIDEO

Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Maharashtra Politics: 'मी रमीचा खेळाडू नव्हे, तर...'भाजपमध्ये प्रवेश करताच सांगळेंचा मंत्री कोकाटोंवर घणाघात

Maharashtra Live News Update: कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरण; सोशल मीडियावर हत्येचं समर्थन करणारा व्हिडिओ पोस्ट

SCROLL FOR NEXT