Ind Vs Pak Asia Cup 2022 Saam Tv
Sports

'आम्ही घाबरणार नाही..', रोहित शर्माने पाकविरुद्धच्या विजयाचा सांगितला फॉर्म्युला

बऱ्याच दिवसानंतर अखेर उद्या म्हणजेच रविवारी भारत आणि पाकिस्तान संघ मैदानावर आमनेसामने येणार आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: टीम इंडिया (Team India) रविवारपासून आशिया कप स्पर्धेत खेळायला सुरूवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे, उद्या म्हणजेच रविवारी हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. टीम इंडियाने या सामन्याने जोरदार तयारी केली आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषद घेऊन या शानदार सामन्याबद्दल पत्रकारांशी चर्चा केली आहे.

'आम्ही आमच्या नियोजनानुसार खेळणार आहे, आम्ही ठरवले आहे की, आम्ही काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार. त्यात आपण यशस्वी होऊ शकतो, अपयशीही होऊ शकतो, पण आपण घाबरणार नाही आणि आपल्या योजनेवर काम करणार आहे, असं कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला.

अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

'आम्ही आता खेळपट्टी पाहिली आहे, त्यावर भरपूर गवत आहे, त्यामुळे सामन्याच्या दिवशी खेळपट्टी कशी आहे हे पाहावे लागेल. त्यानुसार टीमची प्लेइंग इलेव्हन ठरवली जाणार आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला. आमच्या संघात जसप्रीत बुमराह नाही. ज्यांना संधी मिळेल ते चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील, असंही रोहित म्हणाला.

ही एक नवीन स्पर्धा आणि नवी सुरुवात आहे. आधी काय झाले याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. एक संघ म्हणून आपण जे विचार करत आहोत ते खूप खास असणार आहेत.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

राखीव: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.

पाकिस्तान: बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमां, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, हसन अली, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT