Asia Cup च्या पुर्वसंध्येला विराटला धोनीची आठवण; भावनिक ट्विट करत म्हणाला, या व्यक्तीचा विश्वासू...

भारतीय संघ सध्या आशिया कप 2022 टी-20 स्पर्धेसाठी युएई (UAE) मध्ये आहे.
Virat Kohli / MS Dhoni
Virat Kohli / MS Dhoni@imVkohli Saam TV

Asia Cup 2022: भारतीय संघ सध्या आशिया कप 2022 टी-20 स्पर्धेसाठी युएई (UAE) मध्ये आहे. 28 ऑगस्ट रोजी भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करत आहे.

मात्र, क्रिकेट चाहत्यांच्या रोहित शर्मासह भारताचा माजी कर्णधार विरोट कोहलीकडून (Virat Kohli) खूप अपेक्षा आहेत. विराट मागील काही महिन्यांपासून त्याच्या फॉर्ममध्ये खेळत नाहीये. शिवाय विराट संघापेक्षा वैयक्तिक आयुष्याकडेच जास्त लक्ष देत असल्याचा त्याच्यावर आरोप देखील होत आहे. तशा काही कॉमेंट त्याचे चाहतेच करत असतात.

विरोट सध्या त्याच्या कारकिर्दीमधील कठीण दिवसांमध्ये असतानाच त्याने काल मध्यरात्री गुरुवारी (२६ ऑगस्ट) कॅप्टन कूल म्हणजेच महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) आठवण काढली आहे. विरोटने रात्री धोनीसोबतचा आपला जूना फोटो ट्विटरवर शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

या ट्विटमध्ये (Tweet) त्याने म्हटलं आहे की, 'या व्यक्तीचा विश्वासू डेप्युटी असणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा आणि रोमांचक टप्पा होता. आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास राहील. 7+18' विरोटने केलेले हे ट्विट क्षणभरात व्हायरल झालं. काही तासांमध्ये विराटचं ट्विट जवळपास 1 लाख 24 हजार लोकांनी ते लाईक केलं आहे, तर 17 हजार लोकांनी ते रिट्विट केलं होतं.

कोहलीने 2008 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केलं. 2008 ते 2014 दरम्यान, माहीच्या कर्णधारपदाखाली कोहलीने आपल्या खेळाचा स्तर उंचावला होता. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या आशिया कपच्या पुर्वसंध्येलाच विरोटने आपल्या जुन्या सहकाऱ्याची आठवण काढल्यामुळे दोघांचे चाहते आनंदीत झाले आहेत.

आशियाई कपसाठी अशी असणार भारताची टीम -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com