virat kohli twitter
Sports

Virat Kohli Century: विराट 'विक्रमादित्य'! सचिन तेंडुलकरसमोरच मोडला सर्वाधिक शतकांचा विक्रम, वनडेत सर्वाधिक ५० शतके

Virat Kohli 50th ODI Century: या सामन्यात विराटने सचिनचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

IND vs NZ, Virat Kohli 50th Century:

मुबंईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना सुरु आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने भीमपराक्रम केला आहे. या डावात त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

ठा विराटचा मोठा रेकॉर्ड

विराट कोहलीने या सामन्यात १०६ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केल. हे त्याच्या वनडे कारिकिर्दीतील ५० वे शतक ठरले आहे.यासह तो वनडे क्रिकेटमध्ये सचिनला मागे सोडत शतकांचं अर्धशतक पूर्ण करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ईडन गार्डन्सच्या मैदानावर त्याने ४९ वं शतक पूर्ण करत वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली होती. (Virat Kohli 50th Century)

वनडेत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज..

विराट कोहली - ५० शतके*

सचिन तेंडुलकर- ४९ शतके

रोहित शर्मा - ३१ शतके

रिकी पाँटिंग - ३० शतके

सनाथ जयसूर्या - २८ शतके (Latest sports updates)

वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या यादीत ५० शतक झळकावत विराट अव्वल स्थानी आहे. तर ४९ शतक झळकावणारा सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने ३१ शतके झळकावली आहेत. रिकी पाँटिंगने ३० तर सनाथ जयसूर्याने २८ शतके झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Snacks : फराळ खाऊन कंटाळलात? दिवाळीला खास बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

नेहलनं बसीरच्या मांडीवर डोकं ठेवलं, केक भरवला; 'Bigg Boss 19'च्या घरात प्रेमाचे वारे, सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून बसेल धक्का-VIDEO

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! जळता दिवा सोफ्यावर पडला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

Guru Gochar 2025: दिवाळीला झालं गुरु ग्रहाचं राशी परिवर्तन; 'या' ३ राशींवर सणाला बरसणार पैसा

SCROLL FOR NEXT