wankhede stadium saam tv
क्रीडा

IND vs NZ: वानखेडेवर 'हा' अर्धा तास ठरतो फलंदाजांसाठी कर्दनकाळ! दिग्गज खेळाडूही येतात गोत्यात

India vs New Zealand World Cup Semi Final: हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

Ankush Dhavre

Wankhede Stadium Sea Breeze:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात टॉस अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे.

यामागचं प्रमुख कारण म्हणजे तो अर्धा तास जो फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतो. या अर्ध्या तासात किती ही फॉर्ममध्ये असलेला फलंदाज विकेट फेकून पॅव्हेलियनची वाट धरतो.

वानखेडे स्टेडियम आणि हाय स्कोरिंग सामने यांचं जवळचं नातं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारतो. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागतो.

यामागचं प्रमुख कारण म्हणजे समुद्री हवा (Sea Breeze). या मैदानावर संध्याकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान फलंदाजी करणं कठीण आहे. कारण समुद्राच्या हवेमुळे खेळपट्टीव ओलावा येतो त्यामुळे दुसऱ्या षटकातील सुरुवातीच्या १० षटकांमध्ये इथे फलंदाजी करणं कठीण होऊन जातं. हेच कारण आहे की, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. (Latest sports updates)

वानखेडे स्टेडियमचे माजी पिच क्युरेटर यांनी सांगितलं की, जर सामना मुंबईत असेल तर सुरुवातीचे १० षटक फलंदाजी करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण यावेळी समुद्री वारे वाहत असतात. त्यामुळे या वेळेत सावध होऊन खेळणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

पिच रिपोर्ट (IND VS NZ Pitch Report)

वानखेडेच्या मैदानावर जो टॉस जिंकेल तोच संघ सामना जिंकण्याची शक्यता अधिक असणार आहे. इथे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणं जास्त फायदेशीर ठरेल. कारण दुसऱ्या डावात गोलंदाजांचे स्विंग होणारे चेंडू फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतात. सुरुवातीचे २० षटक खेळून काढल्यानंतर पुढील ३० षटक फलंदाजी करणं सोपं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT