Rohit sharma twitter
Sports

IND vs NZ: याला म्हणतात कॉन्फिडन्स! टॉसबाबत विचारलेल्या प्रश्नावर कॅप्टन रोहिततं भन्नाट उत्तर; म्हणाला,' या मैदानावर..'

India vs New Zealand Semi Final: टॉसबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर रोहित शर्माने भन्नाट उत्तर दिलं आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Statement, IND vs NZ Semi Final 2023:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. साखळी फेरीतील ९ पैकी ९ सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. वर्ल्डकप सेमीफायनलचा पहिला सामना गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी टॉस फॅक्टर मोठा फॅक्टर असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माने टॉसबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

या सामन्याच्या पुर्वसंध्येला बोलताना रोहित शर्माला टॉसबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत रोहित शर्मा म्हणाला की,' मला वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. या मैदानावर टॉस महत्वाचा नसतो. माझा फोकस फक्त सामन्यावर आहे. मी इतर गोष्टींचा १९ तारखेनंतर विचार करेल.'

तसेच तो पुढे म्हणाला की,'आम्ही गेल्या ९ सामन्यांमध्ये दबाव उत्तमरित्या हाताळला आहे. पहिल्या सामन्यापासून ते साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापर्यंत खेळाडू दमदार खेळाडू दमदार खेळ करताना दिसून आले आहेत. आम्ही या स्पर्धेत केवळ खेळावर लक्ष केंद्रित करुन आहोत. येणाऱ्या पुढील दोन सामन्यांमध्येही आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करणार आहोत.' (Latest sports updates)

वानखेडे स्टेडियमवर टॉस किती महत्वाचा?

वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ४ सामने खेळले गेले आहेत. हे चारही सामने डे - नाईट सामने होते. या सामन्यांमध्ये एक साम्य पाहायला मिळालं. ते म्हणजे, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने धावांचा डोंगर उभारला. तसेच पहिल्या डावात फलंदाजी करणं सोपं होतं. तर धावांचा पाठलाग करणं कठीण राहिलं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

Mumbai Local : मुंबईकरांना मोठी भेट! नव्याकोऱ्या 268 एसी लोकल ट्रेन येणार, प्रवास गारेगार होणार!

SCROLL FOR NEXT