IND vs NZ ODI Washington Sundar injury saam tv
Sports

IND vs NZ ODI: पहिल्याच सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत, या खेळाडूला मिळाली संधी

IND vs NZ ODI Washington Sundar injury: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सिरीजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर पहिल्याच सामन्यात जखमी झाला असून त्याला सिरीजमधून बाहेर बसावे लागले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

रविवारी भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला वनडे सामना खेळवण्यात आला. हा सामना टीम इंडियाने जिंकला. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झालीये. यामुळे पुढच्या दोन्ही वनडे सामन्यातून त्याला बाहेर बसवण्यात येणार आहे. दरम्यान बीसीसीआयने त्याच्या जागी आयुष बदोनीचा टीममध्ये समावेश केल्याची माहिती दिलीये.

दिल्लीचा २६ वर्षीय आयुष बदोनी वॉशिंग्टन सुंदरनी रिप्लेसमेंट म्हणून टीम इंडियामध्ये सहभागी होणार आहे. आयुषला पहिल्यांदा टीम इंडियाकडून बोलावणं आलंय.

Ayush Badoni बनला Sundar ची रिप्लेसमेंट

वडोदरामध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. गोलंदाजी करताना वॉशिंग्टनला दुखापत झाली असून त्याला आतड्यांमध्ये वेदना होऊ लागल्यात. ज्यामुळे काही काळानंतर मैदानाबाहेर निघून गेला.

फलंदाजीसाठी उतरला वॉशिंग्टन

पहिल्या वनडे सामन्याच वॉशिंग्टन फलंदाजी करणार का असा प्रश्नही उपस्थित होत होता. मात्र विराट कोहली बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या विकेट्स पडू लागल्या तेव्हा सुंदर ८ व्या नंबरवर फलंजादी करण्यासाठी उतरला. यावेळी त्याने ७ चेंडूंमध्ये ७ रन्स केले. त्याला फलंदाजी करणं जमत नाहीये हे तो खेळताना दिसून येतं होतं.

सामन्यानंतर त्याचे मेडिकल रिपोर्ट्स समोर आले. त्याचं स्कॅन करण्यात आलं. अशावेळी बरगड्यांमध्ये होणाऱ्या वेदनांमुळे त्याला न्यूझीलंडविरूद्धच्या उर्वरित सामन्यांविरूद्ध बाहेर बसण्याचा निर्णय घेतला गेलाय.

बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा

दरम्यान आता बीसीसीआयने अधिकृत माहिती देताना वॉशिंग्टन सुंदरच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. दिल्लीचा आयुष बदोनी वॉशिंग्टनला रिप्लेस करणार आहे. दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी तो टीम इंडियासोबत असणार आहे.

कसं आहे आयुषचं क्रिकेट करियर?

आयुष बदोनीने २१ प्रथम श्रेणी सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याने १,६८१ रन्स केले असून २२ विकेट्स घेतल्या आहेत. २७ लिस्ट ए सामन्यांमध्ये ६९३ रन्स करत त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ९६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये १,७८८ रन्स करत त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत.

भारताची अपडेटेड टीम

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली , केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रवींद्र जडेजा , मोहम्मद सिराज , हर्षित राणा , प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी , अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) आयुष बडोनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी राष्ट्रपतींची तब्येत बिघडली; दोन वेळा बेशुद्ध झाल्यानंतर थेट AIIMS मध्ये दाखल

Maharashtra Live News Update : एका घरात तीन लोकांना मिळून १५ कोटींची ऑफर- राज ठाकरे

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किन हवी असेल तर रोज रात्री चेहऱ्यावर लावा 'हे' जेल आठवड्याभरात मिळेल फरक

Shrikhand Puri Recipe: मकरसंक्रात सणाचा गोडवा वाढवण्यासाठी बनवा स्वादिष्ट श्रीखंड पुरी, वाचा सोपी रेसिपी

मोठी बातमी! ठाकरे बंधूंना मराठा मोर्चाचा पाठिंबा, मनोज जरांगेंचे पोस्टरद्वारे आवाहन, VIDEO

SCROLL FOR NEXT