आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये न्यूझीलंडने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ताबडतोड सुरुवात करुन दिली. रोहितने अवघ्या ४१ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
रोहितने यापूर्वीही अनेकदा अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र हे अर्धशतक अतिशय खास ठरलं आहे. कारण यापूर्वी त्याने आयसीसीच्या फायनल्समध्ये खेळताना कधीच अर्धशतक झळकावलं नव्हतं. त्यामुळे रोहितने झळकावलेलं हे अर्धशतक ऐतिहासिक ठरलं आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला गरज होती. तेव्हा तेव्हा त्याने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. या सामन्यातही त्याने ७६ धावा चोपल्या. यासह त्याने गिलसोबत मिळून शानदार शतकी खेळी केली.
रोहितने शुभमन गिलसोबत मिळून १० षटकात ६४ धावा चोपल्या. मात्र त्याला आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवता आलं नाही. फायनलच्या सामन्यापूर्वी तो ४ डावात फलंदाजीला आला होता. यादरम्यान त्याला २६ च्या सरासरीने १०४ धावा करता आल्या होत्या. फायनलमध्ये त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. रोहितने ८३ चेंडूंचा सामना करत ७६ धावा चोपल्या.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने भारतीय संघाला वेगवान सुरुवात करून दिली. रोहितने सुरुवातीच्या ८ षटकात चौकार षटकारांचा पाऊस पाडला. रोहितने ३ षटकार खेचले. यासह रोहितच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना रोहितने ३३ वा षटकार खेचला. यासह त्याने ख्रिस गेलला मागे सोडलं आहे. गेलने धावांचा पाठलाग करताना ३२ षटकार मारले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.