Sports

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

Glenn Phillips Fielding : ग्लेन फिलिप्सने गिलचा एक जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अविश्वसनीय क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये चर्चा चालू आहे.

Bharat Jadhav

  • IND vs NZ सामन्यात ग्लेन फिलिप्सचा अफलातून फिल्डिंग प्रयत्न

  • रोहित आणि गिल जवळपास ‘शॉ’ झाले, पण नशिबाने वाचले

  • कॅच सुटला तरी फिलिप्सची फिल्डिंग तुफान चर्चेत

ग्लेन फिलिप्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याचा सर्वोत्तम फिल्डर आहे. मागील काही सामन्यात ग्लेन फिलिप्सने कुणालाही अशक्य वाटतील असे कॅच पकडलेत. ग्लेन फिलिप्स जगातला सर्वोत्तम फिल्डर का म्हणतात? हे भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या वनडे मॅचमध्ये दाखवून दिलं. ग्लेन फिलिप्सने पॉईंटवर उभा असताना चित्त्यासारखी झेप घेत झेल कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. कॅच सुटला असेल तरी त्यांच्या फिल्डिंगची तुफान चर्चा होत आहे.

बडोद्यामधल्या पहिल्या वनडेमध्ये न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 301 धावांचे आव्हान दिलं. त्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंगला आले. यानंतर 8व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला झॅकरी फोक्सच्या बॉलिंगवर गिलने पॉईंटच्या दिशेने कट मारला. चेंडू गोळीच्या वेगाने हा बॉल जात असतानाच ग्लेन फिलिप्सने डाव्या बाजूला उडी मारून कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण फिलिप्स हवेत असतानाच त्याच्या हातातून चेंडू निसटला. कॅच सुटल्यानंतर ग्लेन फिलिप्स नाराज झाला. मात्र फिलिप्सची फिल्डिंग पाहून रोहित शर्मा आणि शुभमन गिल थक्क झाले.फिलिप्सच्या फिल्डिंगची चर्चा सर्वत्र होतेय.

गिलचा कॅच पकडता आला नसला तरी न्यूझीलंडला पुढच्या ओव्हरमध्येच रोहित शर्माच्या रुपात यश मिळालं. काईल जेमिसनच्या बॉलिंगवर रोहित शर्मा कव्हरच्या वरून शॉट मारायला गेला, पण कर्णधार मायकल ब्रेसवेलने त्याचा कॅच पकडला. 29 बॉलमध्ये 26 रन करून रोहित पॅव्हेलियनमध्ये परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT