ind vs nz twitter
Sports

IND vs NZ : न्यूझीलंडने फायनल गाठली अन् टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; हे कारण तुम्हाला माहितच नसेल

India vs New Zealand Final: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ भिडणार आहेत. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये जाणारे दोन्ही संघ ठरले आहेत. स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलचं तिकिट मिळवलं. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

दोन्ही संघ ९ मार्चला आमनेसामने येणार आहेत. मात्र न्यूझीलंडचं फायनलला येणं हे भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारं आहे. भारताने गेल्या चारही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मात्र न्यूझीलंड भारताचं टेन्शन वाढवू शकते. काय आहे कारण? जाणून घ्या.

फायनलमध्ये न्यूझीलंड भारतीय संघावर भारी

भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघ आहे यात काहीच शंका नाही. भारताने या स्पर्धेतील सलग ४ सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे न्यूझीलंडनेही मजबूत संघांना पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडलाही हलक्यात घेता येणार नाही. आयसीसीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडची सरासरी ही १०० टक्के इतकी राहिली आहे.

२ वेळा झालाय पराभव

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आयसीसीची फायनल खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ १५ ऑक्टोबर २००० मध्ये आमनेसामने आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीतील या फायनलच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने २ चेंडू शिल्लक ठेवून दिलेलं आव्हान पूर्ण केलं होतं. त्यानंतर हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला होता. हा फायनलचा रेकॉर्ड आहे. मात्र भारताने न्यूझीलंडला २ वेळेस सेमीफायनलमध्ये पराभूत केलं आहे.

भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास

भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल गाठली आहे. भारताने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर पाकिस्तानलाही ६ गडी राखून पराभूत केलं. शेवटी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा ४४ धावांनी धुव्वा उडवला. सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT