Sa vs Nz: जे कोणालाच नाही जमलं, ते विलियम्सनने करुन दाखवलं; असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Kane Williamson Record: न्यूझीलंड आणि दक्षि आफ्रिका यांच्यातील सामन्यात केन विलियम्सनने शानदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
Sa vs Nz: जे कोणालाच नाही जमलं, ते विलियम्सनने करुन दाखवलं; असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज
kane williamsontwitter
Published On

आयसीसी चॅम्पियन्स २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता.

न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडत, या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना, केन विलियम्सन आणि रचिन रविंद्रने शानदार शतकी खेळी केली. दरम्यान विलियम्सनने शतक झळकावताच मोठा रेकॉर्ड आपल्या नाववर केला आहे.

केन विलियम्सनने आपल्या वनडे कारकिर्दीतील १५ वे शतक झळकावले. या खेळीदरम्यान त्याने ९४ चेंडूंचा सामना करत १०२ धावा चोपल्या. विलियम्सनच्या या खेळीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ६१ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

त्यानंतर अवघ्या ३० चेंडूंमध्ये त्याने शतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने रचिन रविंद्रसोबत मिळून शतकी भागीदारी देखील केली. या शतकी भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला. हे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील ४८ वे शतक ठरले आहे. यासह त्याने स्टीव्ह स्मिथच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Sa vs Nz: जे कोणालाच नाही जमलं, ते विलियम्सनने करुन दाखवलं; असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज
Ind Vs Aus Match Highlights : विराटची संयमी खेळी ते हार्दिकची हार्ड हिटिंग, ही आहेत भारताच्या विजयाची प्रमुख कारणे

असा रेकॉर्ड करणारा न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज

या शतकी खेळीदरम्यान केन विलियम्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९,००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. हा रेकॉर्ड त्याने ४४० व्या डावात केला आहे. तर सर्वात कमी डावात १९,००० धावांचा पल्ला गाठण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने हा कारनामा ३९९ व्या डावात केला होता. तर सचिनने हा कारनामा ४३२ व्या डावात केला होता.

Sa vs Nz: जे कोणालाच नाही जमलं, ते विलियम्सनने करुन दाखवलं; असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज
Champions Trophy: दुष्काळात तेरावा महिना..भारत दुबईत खेळणार, पण पाकिस्तानचं दिवाळं निघालं

न्यूझीलंडने केल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोच्च धावा

न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. विल यंग अवघ्या २२ धावा करत माघारी परतला. त्यानंतर विलियम्सन आणि रचिनने मिळून न्यूझीलंडचा डाव सांभाळला. दोघांनी १५ हून अधिक धावांची भागीदारी केली. रचिनने १०८, तर विलियम्सनने १०२ धावांची खेळी केली. तर डॅरील मिशेलने ४९ आणि शेवटी फिलिप्सने नाबाद ४९ धावांची खेळी करुन संघाची धावसंख्या ३६२ वर पोहोचवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com