akash deep  twitter
Sports

IND vs NZ 3rd Test: आकाश दीपच्या रॉकेट बॉलवर टॉम लेथमची बत्ती गुल; स्टम्प उडून पडले लांब- VIDEO

Tom Latham Wicket, IND vs NZ 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात आकाश दीपने टॉम लेथमची बत्ती गुल केली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात २८ धावांनी मोठी आघाडी घेतली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडने २३५ धावा केल्या होत्या.

तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २६३ धावा केल्या. दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला आकाश दीपने पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला.

लेथमला दाखवलं आस्मान

न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना, डेवोन कॉनव्हे आणि टॉम लेथमची जोडी मैदानावर आली. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आकाश दीप गोलंदाजीला आला.

रोहितने सुरुवातीपासूनच एका बाजूने वॉशिंग्टन सुंदर तर दुसऱ्या बाजूने आकाश दीपला गोलंदाजीला लावलं. मात्र पहिल्याच षटकात आकाश दीपने न्यूझीलंडला पहिला मोठा धक्का दिला. या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने टॉम लेथमला पायचित केलं होतं. मात्र कॉनव्हेने डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये तो नॉट आऊट असल्याचं दिसून आलं.

पाचव्याच चेंडूवर त्याने कॉनव्हेची दांडी गुल केली. त्याने राऊंड द विकेटने टाकलेला चेंडू टप्पा पडून आत आला आणि टॉम लेथमची दांडी गुल करुन गेला. लेथम १ धाव करत माघारी परतला. यासह न्यूझीलंडला पहिला धक्का बसला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला २६५ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना,शुभमन गिलने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. तर रिषभ पंत ६० धावा करत माघारी परतला. तर वॉशिंग्टन सुंदरने ३८ आणि यशस्वी जयस्वालने ३० धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT