rishabh pant twitter
Sports

IND vs NZ: आजपासून भारताची खरी कसोटी! पुण्यात टीम इंडिया कमबॅक करणार की न्यूझीलंड इतिहास रचणार?

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 2nd Test: सध्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर मालिकेतील दुसरा सामना आजपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर रंगणार आहे.

भारतीय संघ या मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होईल.

मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने कमबॅक केलं मात्र, हा सामना ८ गडी राखून गमवावा लागला.

हा सामना गमावूनही भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मात्र गुण कमी झाल्याने भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. आता पुढील दोन्ही सामने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३ सामने तरी जिंकावे लागणार आहेत.

फिरकी गोलंदाज चमकणार?

पुण्यातील खेळपट्टी ही भारतीय गोलंदाजांसाठी फायदेशीर असणार आहे. कारण ही खेळपट्टी बनवण्यासाठी काळया मातीचा वापर केला गेला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचे चेंडू कमी उसळी घेतील. तर दुसरीकडे भारतीय फिरकी गोलंदाज चमकतील. काळया मातीची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय फिरकी गोलंदाजांच्या फिरकी गोलंदाजीवर डान्स करताना दिसून येऊ शकतात.

या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT