tom latham twitter
Sports

IND vs NZ: लॅथम ठरतोय अश्विनचा Bunny; तब्बल ९ व्यांदा झाला आऊट; अण्णाने सर्वाधिकवेळा कोणाला केलंय बाद?

R Ashwin Dismissed Tom Latham: आर अश्विनने दुसऱ्या कसोटी सामन्यात टॉम लेथमला बाद करत माघारी धाडलं आहे.

Ankush Dhavre

R Ashwin Dismissed Tom Latham: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. मालिकेत आघाडीवर असलेल्या न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे.

आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. कसोटीत डावखुऱ्या फलंदाजांची शिकार कशी करायची हे अश्विनला चांगलंच माहित आहे. त्यामुळेच कसोटीत सर्वाधिक वेळेस डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा रेकॉर्ड हा अश्विनच्या नावे आहे. आता अश्विनच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

डावखुऱ्या फलंदाजांना सर्वाधिक वेळेस बाद करणाऱ्या अश्विनने टॉम लेथमची नवव्यांदा शिकार केली आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळेस बाद होणाऱ्या डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉम लेथम तिसऱ्या स्थानी आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर टॉम लेथम नवव्यांदा बाद झाला आहे. या यादीत बेन स्टोक्स अव्वल स्थानी आहे. स्टोक्स १३ वेळेस बाद झाला आहे. तर डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानी आहे. वॉर्नर ११ वेळेस बाद होऊन माघारी परतला आहे.

अश्विनच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळेस बाद होणारे डावखुरे फलंदाज

  • बेन स्टोक्स -१३ वेळेस

  • डेव्हिड वॉर्नर - ११ वेळेस

  • टॉम लेथम - ९ वेळेस

  • अॅलेस्टर कुक- ९ वेळेस

  • जेम्स अँडरसन - ९ वेळेस

सर्वाधिक वेळेस टॉम लेथमला बाद करणारे गोलंदाज

  • स्टूअर्ट ब्रॉड- १० वेळेस

  • आर अश्विन- ९ वेळेस

  • मिचेल स्टार्क- ५ वेळेस

  • नॅथन लायन - ५ वेळेस

  • केमार रोच - ५ वेळेस

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत ( यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, रविंद्र जडेजा, आर अश्विन

न्यूझीलंड - टॉम लाथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओ'रूर्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

SCROLL FOR NEXT