kl rahul gautam gambhir twitter
Sports

IND vs NZ: KL Rahul खेळणार! हेड कोच गंभीरकडून पाठराखण; टीका करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

Gautam Gambhir On KL Rahul: केएल राहुलवर जोरदार टीका केली जात आहे. मात्र गौतम गंभीर त्याची पाठराखण करताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

केएल राहुलला भारतीय कसोटी संघात सातत्याने संधी दिली जात आहे. मात्र त्याला या संधीचं सोनं करता आलेलं नाही. आधी बांगलादेशविरुद्ध झालेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं.

आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात केएल राहुलला दोन्ही डावात मिळून १२ धावा करता आल्या. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. तर दुसरीकडे संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्याला बॅक करताना दिसून आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान सामन्याच्या १ दिवसाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीरला केएल राहुलबाबत प्रश्न विचारण्यात आला.

काय म्हणाला गौतम गंभीर?

केएल राहुलचा बचाव करताना गौतम गंभीर म्हणाला की, ' सोशल मीडिया प्लेइंग ११ ठरवत नाही. सोशल मीडिया किंवा एक्सपर्ट्सला काय वाटतं हे महत्वाचं नाही. टीम मॅनेजमेंट काय विचार करतंय हे महत्वाचं आहे. कानपूरच्या खेळपट्टीवर केएल राहुल उत्तम फलंदाजी केली. राहुलला देखील मोठी खेळी खेळायची आहे आणि टीम मॅनेजमेंट त्याला समर्थन करेल.'

केएल राहुलला कसोटी संघात सातत्याने संधी दिली जात आहे. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता येत नाहीये. त्याने इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असताना ८६ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही.

कानपूर कसोटीत त्याने ४३ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळेच गंभीर त्याचा बचाव करतोय. गंभीरच्या म्हणण्यावरुन हे स्पष्ट आहे की, केएल राहुलला दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips : मुलं सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात? स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

धक्कादायक पण दुर्मिळ घटना! जन्मत: दात असलेलं 1 किलोचं बाळ! मुंबईत डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: खालापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात गर्भवती महिलेला झोळीचा आधार

महिनाभर गोड खाणं बंद केलं तर शरीरात काय बदल होतील?

Shocking : धक्कादायक! वॉटर पार्कमध्ये ४७ वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT