rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Statement: लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित भडकला! कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

India vs NewZealand 2nd Test, Day 3: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Statement: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका ही भारतीय संघासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी राहिलेली नाही. मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला होता.

या सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या पराभवानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत कमबॅक करेल, असं वाटलं होतं. मात्र असं काहीच झालेलं नाही. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यासह भारताने कसोटी मालिका २-० ने गमावली आहे. तब्बल १२ वर्षांनंतर भारताने मायदेशात खेळताना मालिका गमावली आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला ?

पराभवानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही जसा विचार केला होता, तसं काहीच झालं नाही. पण न्यूझीलंडला क्रेडिट द्यावं लागेल. त्यांनी खरंच चांगला खेळ केला. आम्हाला काही ठिकाणी संधी मिळाली होती, मात्र आम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकलो नाही. सामना जिंकण्यासाठी २० गडी बाद करावे लागतील,पण फलंदाजांनी धावा करणंही तितकंच महत्वाचं आहे.'

फलंदाजांबद्दल बोलताना रोहित काय म्हणाला?

'न्यूझीलंडला २५० धावांवर थांबवून आम्ही दमदार कमबॅक केलं. मात्र आम्हाला माहीत होतं की, आव्हान कठीण असणार आहे. ज्यावेळी त्यांनी सुरुवात केली, त्यावेळी त्यांची धावसंख्या ३ गडी बाद २०० होती. त्यानंतर आम्ही त्यांना २५९ धावांवर ऑलआऊट केलं. या खेळपट्टीत काहीच दोष नव्हता. फक्त आम्ही चांगली फलंदाजी करु शकलो नाही.' असं रोहित शर्मा म्हणाला.

पराभवाला कारणीभूत कोण?

'जर आम्ही पहिल्या डावात आव्हानाच्या आणखी जवळ पोहचू शकलो असतो,तर गोष्टी वेगळ्या असत्या. आता आम्हाला वानखेडे मैदानावर होणाऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करायची आहे. आम्हाला हा कसोटी सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. चूक कुठल्या एका खेळाडूची नाही. हा एक टीम फेलियर आहे. वानखेडेमध्ये आम्ही नव्या जोशाने मैदानात उतरु.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT