rohit sharma  yandex
क्रीडा

IND vs NZ, 1st Test: रोहित शर्मा चुकला, तो निर्णय भारताच्या अंगलट आला! सामनाही हातातून निसटणार?

Ankush Dhavre

India vs Newzealand 1st Test: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वाचीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्माची एक चूक भारतीय संघाला नडली आहे.

रोहित शर्माची ही चूक भारतीय संघाला नडली?

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय चुकीचा ठरला. या सामन्याला १६ ऑक्टोबरला सुरुवात होणार होती. मात्र सामन्यातील पहिल्या दिवशी पावसाने थैमान घातला. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

मात्र सकाळी पाऊस नसल्याने हा सामना ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर सुरु झाला. सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण होतं. खेळपट्टीही गोलंदाजीसाठी अनुकूल होती. मात्र रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक १० फलंदाजांना माघारी धाडलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना उसळी मिळत होती. याचा गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ फलंदाजीला आला तेव्हा ऊन पडल्याने खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल झाली. त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी झटपट धावा केल्या.

भारतीय संघाचा डाव ४६ धावांवर आटोपला

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव ४६ धावांवर आटोपला. भारतीय संघातील ५ फलंदाज शून्यावर माघारी परतले. रिषभ पंतने २० धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालने १३ धावांची खेळी केली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड - डेवोन कॉनव्हे, टॉम लेथम, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरेल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी, टीम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओ रुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : प्रेम, प्रणयाला नवे रंग फुटणार; दिवस आनंदी राहणार; वाचा आजचे राशीभविष्य

Varun Sardesai : वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीवरून मविआत ठिणगी? वांद्रे पूर्वसाठी ठाकरेंच्या विश्वासूंना उमेदवारी घोषित, VIDEO

Kolhapur Politics: चंदगडच्या उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपचा दावा

Maharashtra News Live Updates : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

Meeting Inside Story : उद्धव ठाकरे अनुपस्थित, आदेश निघाला; मातोश्रीवरच्या आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT