Shubman Gill Hits Century saam tv
Sports

Ind vs Eng Test Match: शुबमन गिलचं विक्रमी शतक, कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'हा' अद्भुत पराक्रम

Shubman Gill Hits Century: या कसोटी सामन्यापूर्वी, शुबमन गिलने गेल्या साडेचार वर्षांत आशियाबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते. पण त्याने हा दुष्काळ संपवला.

Bharat Jadhav

टीम इंडियाचा कर्णधार होताच शुबमन गिलची बॅट तळपली. इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीत पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणाऱ्या गिलने शतक झळकावून आपल्या कर्णधारपदाची शानदार सुरुवात केलीय. शुक्रवारी लीड्स येथे सुरू झालेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात नवीन भारतीय कर्णधार गिलने आश्चर्यकारक शतक झळकावलं. हे शतक गिलच्या कारकिर्दीतील सहावे शतक होतं.

यासह, गिलचे नाव कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक झळकावणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झालाय. हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील या पहिल्या सामन्यात सर्वांच्या नजरा गिलवर होत्या. कसोटी कर्णधार म्हणून त्याचा प्रवास या कसोटी मालिकेपासून सुरू झाला. परंतु पहिल्याच सामन्यात गिलनं आपल्या कामगिरीने सर्वांना आर्श्चचकित केलं.

दरम्यान याआधी इंग्लंडसह आशियाबाहेरील देशांमध्ये त्याचा कसोटी रेकॉर्ड खूपच खराब होता. यामुळे, सर्वांनाच पहायचे होतं की, गिल कर्णधारपदाच्या दबावाखाली आपला रेकॉर्ड सुधारू शकतो की नाही. पण वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारणाऱ्या गिलने पहिल्याच दिवशी याला चोख उत्तर दिले.

कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या पहिल्याच दिवशी शतक

पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला गिल फलंदाजीसाठी आला. कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच डाव होता. पण तो पहिल्यांदाच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत नव्हता. मात्र कर्णधार म्हणून तो या क्रमांकावर पहिल्यांदा फलंदाजी करत होता. गिलसाठी ही एक महत्त्वाची परीक्षा होती, ही परीक्षा उत्तमप्रकारे पार केली.

यशस्वी जैस्वालने शतक पूर्ण करून सुरुवात केली. तर दिवसाचा शेवटचा सत्र संपण्यापूर्वी गिलने कसोटी क्रिकेटमधील हा खास टप्पा गाठला. ७५ व्या षटकात जोश टँगच्या चेंडूवर चौकार मारून गिलने त्याच्या कारकिर्दीतील सहावे शतक पूर्ण केलं. त्याने शतक फक्त १४० चेंडूत पूर्ण केले. यात १४ चौकारांचा समावेश होता.

गिलचे हे शतक खूप खास होते कारण त्याने केवळ काही विक्रमच केले नाहीत तर टीकाकारांनाही उत्तर दिले. या खेळीपूर्वी गिलने गेल्या साडेचार वर्षांत आशियाबाहेर कोणत्याही कसोटी सामन्यात अर्धशतकही झळकावले नव्हते. तो गेल्या १८ डावांमध्ये अपयशी ठरला होता. पण यावेळी त्याने केवळ ५० धावांचा टप्पा ओलांडला नाही तर आशिया खंडाबाहेर त्याच्या कर्णधार म्हणून पहिल्या कसोटीत शतकही झळकावले. परदेशी भूमीवरील हे त्याचे दुसरे शतक आहे. यापूर्वी, डिसेंबर २०२२ मध्ये त्याने चिटगाव येथे बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

अगं बाई! विदेशातही पोहोचला महाराष्ट्राचा ठसका! इटालियन महिलांनी गायले मराठी गाणं 'आता वाजले की बारा'

SCROLL FOR NEXT