भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी (Fifth Test Match) मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना मँचेस्टरच्या ओल्ड टॅफोर्ड क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. नॉटिंगहॅममध्ये खेळलेला पहिला सामना अनिर्णित राहिला होता. यानंतर टीम इंडियाने लॉर्ड्सवर जोरदार विजय नोंदवला. भारतीय संघाला लीड्समध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर चौथ्या सामन्यात विराट कोहलीच्या सैन्याने शानदार पुनरागमन केले आणि ओव्हल कसोटी जिंकली. आता भारताला अशा मैदानावर सामना खेळावा लागणार आहे. जिथे त्यांनी आतापर्यंत एकही कसोटी जिंकलेली नाही.
पाचवा कसोटी सामना 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. जरी भारतीय संघ हा सामना हरला तरी तो मालिका गमावणार नाही. पण टीम इंडियाला हा सामना ड्रॉ झाला तरी चालणार आहे. कारण भारतीय संघ 2007 नंतर मालिका जिंकणार आहे. इंग्लंडने विजय मिळवल्यास मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल. भारताने आतापर्यंत मँचेस्टरमध्ये 9 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान संघाला 2014 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.
जर भारतीय संघाने मँचेस्टरमध्ये प्रथमच विजय मिळवला तर तो इतिहास ठरणार आहे. टीम इंडिया 1936 मध्ये पहिल्यांदा या मैदानावर खेळायला आली होती. त्यानंतर सामना अनिर्णित करण्यात यशस्वी झाली. त्या वेळी इंग्लंडमध्ये बरोबरी मिळवणे विजयाएवढे मानले जात होते. यानंतर 1946 मध्ये खेळलेली कसोटीही अनिर्णित राहिली. 1952 मध्ये भारताला पहिल्या पराभवाला सामोरं जावे लागले होते.
भारतीय संघ 1990 मध्ये पहिल्यांदा मालिका हरला होता. 2014 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला येथे एका डावाने पराभवाला सामोरे जावे लागले. विराट कोहली या सामन्यात भारताचा खराब रेकॉर्ड बदलणार का याकडे लक्ष आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.