भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात 5 कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना लीड्च्या हेडिंग्लेमध्ये खेळला जातोय. काल सामन्यातील तिसरा दिवस होता. भारताने तिसरा दिवस संपण्याअगोदर सामन्यात वापसी केली आहे. पुजारा (Chetteshwar Pujara) आणि कोहलीला (Virat Kohli) सुर गवसला आहे. भारत सध्या दोन गड्यांच्या मोबादल्यात 215 धावांवरती खेळत आहे. भारत अजूनही 139 धावांनी पिछाडीवर आहे. कोहली 45 तरल पुजारा 91 धावांवरती खेळत आहे.
दरम्यान, इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा बनवल्या आहेत. इंग्लंडने 354 धावांची आघाडी घेतली होती. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक चार बळी घेतले तर रविंद्र जडेजा आणि मोदम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले आहेत. पहिल्या डावात भारतीय संघ 78 धावांवर गारद झाला होता.
पहिल्या डावात 354 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात भारताला चांगली सुरुवात होऊ दिली नाही. केएल राहुल 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर पुजारा आणि रोहित शर्मा यांच्यातील महत्त्वपूर्ण भागीदारीने भारताला सावरले. मात्र, रोहित 59 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने 99 धावांची अत्यंत महत्त्वपुर्ण भागीदारी करून संघाला चांगल्या स्थितीत आणले. डावातील पराभव टाळण्यासाठी भारतीय संघाला अजूनही 139 धावा करणे आवश्यक आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.