IND vs ENG T20 WC Semi Final  
Sports

IND vs ENG T20 WC Semi Final: टीम इंडियाचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; आता अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार

IND vs ENG T20 WC Semi Final : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडचा रोमांचित सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना २५३ धावा केल्या होत्या.

Bharat Jadhav

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयसीसी टी२० च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार फलंदाजी केली. फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंजदाजांना दबावाखाली ठेवलं. २५३ धावांचा पाठलाग करताना ब्रिटिश फलंदाजांची दमछाक झाली.

भारतीय संघाने वानखेडेवर इंग्लंडचा धुव्वा उडवत धावांनी 7 उपांत्य फेरीचा सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकांत केवळ २४६ धावा करता आल्या आणि ७ धावांनी पराभव पत्करावा लागला. टीम इंडिया आता ८ मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात न्यूझीलंड भिडणार आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपचा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ७ गडी गमावून २५३ धावा केल्या होत्या. वानखेडे स्टेडियमवर सामना जिंकण्यासाठी २००च्यावरती धावांची गरज असते, तीच रणनीती लक्षात ठेवत टीम इंडियानं २५३ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं. संजू सॅमसनच्या ८९ धावांच्या शानदार खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यानंतर भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडच्या फलंदाजाची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडने लवकरच पाच विकेट गमावल्या.फिल सॉल्टला हार्दिक पंड्याने फक्त ५ धावांवर बाद केले. दरम्यान, हॅरी ब्रुकला जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने ७ धावांवर झेलबाद केले. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुककडून मोठी खेळी अपेक्षित होती, परंतु जसप्रीत बुमराहने त्याला फक्त ७ धावांवर बाद केले.

अशाप्रकारे, इंग्लंडने पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्या आणि धावसंख्या ३८ पर्यंत पोहोचला होता. जेकब बेथेलने जोस बटलरला साथ दिली पण डावाच्या सहाव्या षटकात १७ चेंडूत २५ धावा काढल्यानंतर बटलर वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या सहा षटकांच्या अखेरीस इंग्लंडने ३ बाद ६८ धावा केल्या होत्या.

पॉवरप्ले संपत असताना जेकब बेथेलने आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आणि एका टोकाकडून मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. या दरम्यान इंग्लंडने टॉस बॅंटनच्या रूपात ९५ धावांवर चौथी विकेट गमावली. तो ५ चेंडूत १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर विल जॅक्स फलंदाजीसाठी आला आणि त्याने जेकब बेथेलला शानदार साथ दिली. पाचव्या विकेटसाठी ३९ चेंडूत ७७ धावांची शानदार भागीदारी करून सामना पूर्णपणे रोमांचक बनवला होता. अक्षर पटेलच्या शानदार कॅचने विल जॅक्सला बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कारण इंग्लंडने १४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर १७२ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे Su-30 MKI लढाऊ विमान गायब, शोध सुरू

Friday Horoscope : ताणतणाव दूर होईल; ५ राशींच्या लोकांना संकटात आई-वडिलांची साथ मिळेल

Iran–US Conflict:भारतावर तेल संकट! देशात इंधनाचा तुटवडा? क्रूड ऑयलबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट

दादांच्या आमदारांनाही घातपाताचा संशय? आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

नवी मुंबईत घडली मोठी दुर्घटना, कोंचिग क्लास सुरू असताना स्लॅब कोसळला; एका विद्यार्थ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT