ind vs eng shubman gill diving superman catch reminds martin crowe diving catch video went viral  twitter
Sports

Shubman Gill Catch: निव्वळ योगायोग! ३७ वर्षांपूर्वी इंग्लंडच्या दिग्गजानेही घेतलेला गिल स्टाईल सुपरमॅन कॅच; पाहा VIDEO

Shubman Gill Superman Catch Video In IND vs ENG 5th Test: न बेन डकेटला बाद करण्यासाठी शुभमन गिलने डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Shubman Gill Diving Catch Video:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ व्या कसोटी सामन्याचा थरार धरमशालेत सुरु आहे. या मालिकेत १-३ ने पिछाडीवर असलेला इंग्लंडचा संघ या मालिकेत आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी उतरला आहे.

तर दुसरीकडे भारतीय संघ मालिकेत मोठी आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला ६४ धावांवर पहिला धक्का बसला. दरम्यान बेन डकेटला बाद करण्यासाठी शुभमन गिलने डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Shubman Gill Catch Video)

गिलचा भन्नाट झेल...

शुभमन गिल हा भारतीय संघातील सर्वात्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. गिलने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक भन्नाट झेल टिपले आहेत. यात आता आणखी एका भन्नाट झेलची भर पडली आहे. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला बाद करण्यासाठी गिलने मागच्या दिशेने धावत हा झेल टिपला.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना १८ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर बेन डकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र टप्पा पडताच कुलदीपचा चेंडू वळाला आणि बॅटची कडा घेत हवेत गेला. त्यावेळी कव्हरला क्षेत्ररक्षण करत असलेल्या शुभमन गिलने मागच्या दिशेने धाव घेतली आणि समोरच्या दिशेने डाईव्ह मारत झेल टिपला. (Cricket news in marathi)

शुभमन गिलच्या या झेलसह आणखी एका झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ १९८७ वर्ल्डकप स्पर्धेतील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, मार्टिन क्रो यांनी मागच्या दिशेने धावत झेल घेतला होता. हे दोन्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT