India Vs England 3rd Test  x
Sports

Ind Vs End : भारतासमोर इंग्लंडचा संघ ढेर, टीम इंडियाला लॉर्ड्सवर इतिहास रचण्याची संधी, विजयासाठी किती धावांचे लक्ष्य?

India Vs England 3rd Test : भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला २०० धावांच्या आत रोखले आहे. लॉर्ड्च्या ऐतिहासिक मैदानावर विजय मिळवण्यासाठी भारतासमोर अवघ्या १९३ धावांचे लक्ष्य आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng : अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीतील तिसरा सामना सध्या लॉर्ड्सच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडने भारतासमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात दोन्ही संघांनी समान ३८७ धावा केल्या. दुसऱ्या डावात प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला १९२ धावांवर रोखले आहे. भारताला लॉर्ड्स कसोटी जिंकण्याची संधी आहे.

लीड्स, एजबॅस्टनप्रमाणे लॉर्ड्समध्येही इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला. पण या वेळेस त्याने प्रथम गोलंदाजी करण्याऐवजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरले. दुसऱ्या दिवसाच्या शेवटपर्यंत इंग्लंडचा डाव ३८७ धावांवर संपुष्टात आला.

पहिल्या डावात इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक १०४ धावा केल्या. जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी अर्धशतकीय खेळी केली. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. त्याच्यापाठोपाठ मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांनीही दोन-दोन गडी बाद करुन माघारी पाठवले. इंग्लंडचा डाव ३८७ धावांवर संपला.

इंग्लंडची फलंदाजी संपल्यानंतर भारतीय खेळाडू फलंदाजीसाठी आले. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर केएल राहुलने जबाबदारी सांभाळली. त्याने पहिल्या डावात शतकीय खेळी देखील केली. त्याला रिषभ पंतची साथ मिळाली. रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी ७० पेक्षा जास्त धावा केल्या. ३८७ धावांवर भारताचा संघ देखील ऑलआउट झाला.

भारत ऑलआउट झाल्यानंतर, इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरले. पण भारताच्या गोलंदाजांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. जो रुटने पुन्हा सर्वाधिक धावा (४० धावा) केल्या. त्याच्यापाठोपाठ बेन स्टोक्सने ३३ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने चार गडी बाद केले. त्याला मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहची साथ लाभली. त्या दोघांनीही प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. आकाश दीप आणि नितीश कुमार रेड्डीने प्रत्येकी १-१ बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT