India Vs England Lords Test x
Sports

Ind Vs End : लॉर्ड्सवर टीम इंडियाचा विजय पक्का, सामना जिंकून भारत मालिकेत आघाडी घेणार; फक्त...

India Vs England Lords Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु आहे. आज या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng 3rd Test च्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. काल (११ जुलै) ३८७ धावांवर इंग्लंडचा संघ ऑलआउट झाल्यानंतर भारताची फलंदाजी सुरु झाली. कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटी १४५/३ अशी भारताची धावसंख्या होती. केएल राहुल (५३ धावा) आणि रिषभ पंत (१९ धावा) तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरले.

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील तिसरा सामना लॉर्ड्सवर सुरु आहे. पहिला सामना लीड्सवर खेळला गेला, हा सामना इंग्लंडने जिंकला. त्यानंतर एजबॅस्टन स्टेडियमवर सामना जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला. मालिकेत दोन्ही संघ बरोबरीवर आहेत. लॉर्ड्सवर विजय मिळवत कोण मालिकेमध्ये आघाडी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. भारताला लॉर्ड्स कसोटी जिंकायची असेल, तर तिसऱ्या दिवशी संघाला या ३ महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील.

१. पहिल्या तासात विकेट न गमावणे

दुसऱ्या दिवसाच्या शेवटी केएल राहुल आणि रिषभ पंत क्रीजवर होते. भारताने ३ विकेट गमावून १४५ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशाच्या पहिल्या तासात विकेट पडल्यास भारतावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे पहिल्या सत्राच्या पहिल्या तासात राहुल आणि पंत यांना मैदानावर टिकून राहणे आवश्यक आहे.

२. २०० हून अधिक धावांची भागीदारी

केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली आहे. जर हे दोघे टिकून खेळले आणि त्यांनी तिसऱ्या दिवशी २०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली, तर भारत चांगल्या स्थितीमध्ये येईल. केएल राहुल आणि रिषभ पंत यांना शतकीय कामगिरी करावी लागेल. त्यांनी २०० हून अधिक धावांची भागीदारी केल्यास लॉर्ड्सवर भारत इंग्लंडवर वरचढ ठरेल.

३. ५०० हून अधिक धावा करणे

जर भारताला लॉर्ड्स कसोटी जिंकायची असेल, तर पहिल्या डावात त्यांना किमान ५०० धावा कराव्या लागतील. भारतीय फलंदाजांचे पहिले लक्ष्य इंग्लंडच्या ३८७ धावा पार करणे असेल. जर भारतीय संघाने पहिल्या डावात ५०० धावा केल्या, तर त्यांच्याकडे १०० हून अधिक धावांची आघाडी असेल. याचा फायदा चौथा आणि पाचव्या दिवशी भारताला होईल. यामुळे इंग्लंडवर मात करणे शक्य होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT