
Rohit Sharma ने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. मे २०२५ मध्ये त्याने कसोटी फॉरमॅटमधूनही संन्यास घेतला. सध्या भारतीय वनडे संघाचा रोहित शर्मा कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्त्वामध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. रोहितकडून वनडेचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. कसोटीनंतर वनडे संघाचेही कर्णधारपद शुभमन गिलकडे दिले जाऊ शकते असे म्हटले जात आहे.
इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेचे आयोजन होणार असल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये या मालिकेसंंबधित चर्चा सुरु आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळले जातील. रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेमध्ये खेळताना दिसू शकतात. मालिकेदरम्यान वनडे संघाचा कर्णधार बदलला जाऊ शकतो अशा चर्चा आहेत.
सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फक्त वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकापर्यंत खेळण्याची दोघांनीही इच्छा व्यक्त केली आहे. २०२७ पर्यंत ते खेळतील की नाही हे त्यांच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे. यादरम्यान रोहित शर्माकडून वनडे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते अशा चर्चा रंगल्या आहेत.
जर वनडेमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले नाही, तर मी वनडे फॉरमॅटमधूनही निवृत्त होईन असे रोहित शर्माने बीसीसीआयला सांगितले असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्सद्वारे केला जात आहे. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून शुभमन गिलकडे दिले जाईल यासंबंधित चर्चांना उधाण आले आहे. पण बीसीसीआयने अद्याप या प्रकरणावर अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.