Jasprit Bumrah x
Sports

Ind Vs Eng : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला धक्का बसणार? बुमराहबद्दलच्या चर्चांमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Birmingham Test मध्ये जसप्रीत बुमराह खेळणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. जर दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळला नाही, तर भारत हा सामना देखील गमावेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Yash Shirke

Jasprit Bumrah : लीड्स कसोटी सामन्यामध्ये पहिल्या डावात पाच गडी बाद करणारा जसप्रीत बुमराह एजबॅस्टन कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नाही असे म्हटले जात आहे. यामुळे भारताचा संघ आणि चाहते चिंताग्रस्त झाले आहे. भारताचा गोलंदाजी विभाग कमकुवत असल्याचे पहिल्या सामन्यात स्पष्ट झाले आहे. जर बुमराह दुसरा कसोटी सामना खेळणार नसेल, तर भारत हा सामना देखील गमावेल अशी भीती रवी शास्त्री यांनी व्यक्त केली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये फक्त तीन सामने खेळणार असल्याचे बुमराहने स्पष्ट केले होते. आता तो कोणता सामना खेळेल हा मोठा प्रश्न आहे. बुमराह लॉर्ड्सवर खेळ इच्छितो. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती घेईल असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. ते स्काय स्पोर्ट्सवर एका कार्यक्रमात बोलत होते.

'लॉर्ड्सचे मैदान वेगवान गोलंदाजांसाठी खूप चांगले आहे. बुमराह तेथे नक्कीच चांगली गोलंदाजी करेल. पण त्या सामन्यापूर्वी बुमराहला पुरेशी विश्रांती द्यायची गरज आहे. जर जसप्रीत बुमराह एजबॅस्टनमध्ये खेळला तर तो लॉर्ड्सवर खेळू शकणार नाही. कारण दोन्ही सामन्यांमध्ये फक्त चार दिवसांचा कालावधी आहे. पण या बाबतचा अंतिम निर्णय संघ व्यवस्थापन घेईल. दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराह खेळला नाही, तर भारत एजबॅस्टन कसोटी सामना देखील गमावू शकतो,' असे वक्तव्य रवी शास्त्री यांनी केले.

पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात बुमराहने पाच विकेट्स घेत रेकॉर्ड केला होता. पण संपूर्ण सामन्यात त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. याचा फायदा इंग्लंडच्या संघाला झाला. जर बुमराह एजबॅस्टन कसोटी सामन्यात सहभागी झाला नाही, तर त्याच्या अनुपस्थिती गोलंदाजी विभागाची स्थिती आणखी बिकट होऊ शकते असे म्हटले जात आहे. बुमराह एजबॅस्टनमध्ये खेळणार की नाही, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT