IND vs ENG Twitter/ @BCCI
क्रीडा

IND vs ENG: BCCI चं ठरलं! जखमी खेळाडूंच्या जागेवर 'या' खेळाडूंना संधी

वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मालिकेसंदर्भात मोठे अपडेट समोर आले आहे. दुखापतीनंतर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) त्याच्या उजव्या हातात इंजेक्शन घेतले होते. त्याचे संघात परतण्याचे संकेत फार कमी आहेत. या कारणास्तव त्याला इंग्लंड दौर्‍यातूृन काढण्यात आले आहे. पहिल्या सराव सामन्यात वेगवान गोलंदाज अवेश खानच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याला फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यालाही भारत इंग्लंड दौऱ्यावरून बाहेर काढण्यात आले आहे.

कसोटी विश्वचषक (WTC 2021) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) दुखापत झाली होती. तोदेखील इंग्लंड दौर्‍याबाहेर गेला आहे. शुभमन भारतात परतला आहे. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या दोन आरटी-पीसीआर चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या आणि तो कोरोनाहून सावरला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याने आगामी कसोटी मालिकेसाठी आपली तयारी सुरू केली आहे.

गोलंदाजी कोच बी अरुण, वृध्दिमान साहा आणि अभिमन्यु ईश्वरण यांनी आपला विलगीकरण कालावधी पुर्ण केला आहे. आणि डरमॅहम मध्ये भारतीय संघासोबत जोडले गेले आहेत. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना जखमी खेळाडूंच्या जागी घेतले आहे, असे निवड समितीने सांगितले आहे. सूर्यकुमार यादवची पहिल्यांदा कसोटी संघात निवड झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. देवदत्त पडिकक्कलला या मालिकेत संधी मिळाली नाहीये.

भारताचा आताचा संघ

रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्सर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृध्दिमान साहा (यष्टिरक्षक), अभिमन्यु ईश्वरण, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

स्टँडबाय खेळाडू

प्रसिद्ध कृष्णा, अर्जन नागवासवाला

(वरील सर्व माहिती BCCI चे सचिव जय शहा यांनी दिली आहे. )

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT