IND vs ENG Test
IND vs ENG Test Saam Tv
क्रीडा | IPL

IND vs ENG 5th Test : पंत जडेजाची झुंजार खेळी; पहिल्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत

Satish Daud-Patil

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी सामन्याला शुक्रवारी सुरूवात झाली. इंग्लंडने प्रथम नाणेफेक जिंकत भारतीला फलंदाजीचे निमंत्रण दिले. कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताचा विस्फोटक फलंदाज ऋषभ पंतने शतक झळकवलं. पंतने फक्त शतक झळकवून रेकॉर्डच केला नाही, तर अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि शुभमन गिल अपयशी ठरले. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारताची टॉप ऑर्डर कोसळली. (IND vs ENG birmingham 5th Test Latest Updates)

मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पंत आणि रवींद्र जडेजाने किल्ला लढवला. जडेजाने पंतला उत्तम साथ दिली. ऋषभ पंतने नेहमीप्रमाणे आपल्या स्टाइलमध्ये फलंदाजी केली. कसोटी सामना असला, तरी ऋषभ पंत वनडे सारखा खेळला. त्याने 89 चेंडूत शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटमधील त्याच हे पाचव शतक आहे. दुसऱ्याबाजूने रवींद्र जडेजाने त्याला चांगली साथ दिली. दोघांनी 150 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली.

पंत जडेजाने किल्ला लढवला

भारताचा निम्मा संघ 98 धावांवर माघारी परतला असताना, ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा या दोन खेळाडूंनी तिथून डाव सावरला. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा समाचार घेतला. टी ब्रेकला पंतने 51 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तिसऱ्या सत्रात ऋषभने आपल्या खेळाचा गेयर बदलला.

इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने पुढच्या एक तासात शतक झळकावलं. आक्रमक फलंदाजी करणारा ऋषभ पंत अखेर 146 धावांवर आऊट झाला. त्याने 111 चेंडूत या धावा केल्या. यात 19 चौकार आणि 4 षटकार आहेत. ज्यो रुटच्या गोलंदाजीवर त्याने क्रॉलीकडे झेल दिला.

पहिल्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत

दरम्यान, ऋषभ पंतचे (146) झुंजार शतक आणि रवींद्र जडेजाच्या (83*) साथीने केलेल्या 222 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे 5 बाद 98 अशा कठीण स्थितीतून भारताला सावरले. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शुक्रवारी भारताने 7 बाद 338 धावा केल्या आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट; पळशीतील तणावाचा Video समोर

Amazon Sale: स्वस्तच नाही, तर मस्तच! iPhone 14 च्या किंमतीत आणखी झाली घट, खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Ajit Pawar On Rahul Gandhi | गांधी घराण्यावर बोलताना अजितदादा चुकले! पुढे काय घडलं?

Uttam Jankar News | Sharad Pawar यांच्यासमोरच अजित पवारांना कावळ्याची उपमा, जानकरांनी सभा गाजवली..

Nashik Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा! कांदा निर्यातबंदी हटवली...

SCROLL FOR NEXT