Ind vs Eng : भारताविरुद्ध टी-२०, वनडे मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, संधी कुणाला? पाहा यादी

भारताविरुद्ध टी-२० आणि वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Cricket
Cricket saam Tv
Published On

मुंबई: भारताविरुद्ध टी-२० आणि वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. जोस बटलर या मालिकेद्वारे पूर्णवेळ कर्णधार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करत आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) भारताविरुद्ध (Team India) तीन-तीन सामन्यांच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा केली आहे. जोस बटलरकडे (Jos Buttler) संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. संघात अष्टपैलू खेळाडू सॅम कुरेनला स्थान मिळालं आहे. स्फोटक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा वनडे संघात परतला आहे.

Cricket
Malaysia Open 2022 : सिंधूचा पराभव; तई त्झु यिंगच्या बॅक हॅंडची चर्चा (व्हिडिओ पाहा)

इंग्लंडचा वनडे संघ

जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, सॅम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, क्रेग ओव्हरटन, एम. पार्किंसन, जो रूट, जेसन रॉय, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेविड विली.

इंग्लंडचा टी-२० संघ

जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, हॅरी ब्रुक, सॅम कुरेन, रिचर्ड ग्लीसन, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, टायमल मिल्स, एम. पार्किंसन, जेसन रॉय, फिल साल्ट, डेविड विली, रीस टॉपली.

Cricket
Cricket News: 'या' बॉलरनं रचला इतिहास; भारताच्या महान गोलंदाजाचा मोडला विक्रम

भारतीय संघाचीही घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) गुरुवारीच इंग्लंडविरुद्धच्या टी -२० आणि वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याकारणाने एजबेस्टन कसोटी सामन्यातून बाहेर झालेला रोहित शर्मा दोन्ही मालिकांमध्ये कर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या टी-२० मध्ये विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा, श्रेयस अय्यर खेळणार नाहीत. या सर्व खेळाडूंचा एजबस्टन कसोटी संघात समावेश आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड वेळापत्रक

७ जुलै - पहिला टी-२० सामना

९ जुलै - दुसरा टी-२० सामना

१० जुलै - तिसरा टी-२० सामना

१२ जुलै - पहिला एकदिवसीय सामना

१४ जुलै - दुसरा एकदिवसीय सामना

१७ जुलै - तिसरा एकदिवसीय सामना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com