भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटीत राडा
प्रसिद्ध कृष्णा आणि जो रूटमध्ये बाचाबाची
अंपायर धर्मसेनामुळे केएल राहुल भडकला
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Ind vs Eng 5th : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा सामना ओव्हलमध्ये खेळला जात आहे. आज (१ ऑगस्ट) या कसोटी सामन्यातील पाचवा दिवस आहे. दिवसाच्या सुरुवातीच्या अर्धा तासातच इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा धुव्वा उडवला. त्यानंतर थोडा वेळ इंग्लंडचे फलंदाज भारतीय संघावर वरचढ ठरले. पण भारतीय गोलंदाजांनी कमबॅक करत इंग्लंडचे अनेक गडी बाद केले. दुसऱ्या दिवशी मैदानावर राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
सामन्यात २२ व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने झॅक क्रॉलीला बाद केले. त्यानंतर अनुभवी जो रूट फलंदाजीसाठी आला. ओव्हरचा पाचवा चेंडू रूटच्या बॅटच्या कडेला लागून गेला. यावरुन प्रसिद्धने रूटला काहीतरी म्हटले. यावर रुटने लगेच प्रतिक्रिया दिली आणि तो प्रसिद्ध कृष्णाजवळ येत काहीतरी बोलताना दिसला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर रूटने उत्तम चौकार मारला. यावरुन प्रसिद्ध कृष्णा आणि जो रूट यांच्यात वाद सुरु झाला.
वाद वाढत असल्याचे पाहत अंपायर कुमार धर्मसेना प्रसिद्ध कृष्णाशी बोलायला गेला. यात भारताचे खेळाडू मध्ये पडले. दुसरे अंपायर अहसान रझा देखील तेथे पोहोचले. धर्मसेना यांनी शुभमन गिलला काहीतरी म्हणाले. जाता-जाता शेवटी केएल राहुलला उद्देशून काहीतरी बोलताना दिसले. यामुळे राहुल नाराज दिसला, त्याने धर्मसेनासमोर नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
२३ व्या ओव्हरमध्ये अंपायर अहसान रझा जो रूटसोबत बोलत होते. ते कदाचित रूटला काहीतरी समजावून सांगत होते. यादरम्यान मोहम्मद सिराज तेथे जाऊन टाळ्या वाजवताना दिसला. तेव्हा जो रूट मोहम्मद सिराजकडे पाहून हसला. ओव्हलच्या मैदानामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटीमध्ये हा ड्रामा पाहायला मिळाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.