Ind vs Eng Team India Playing XI X
Sports

Ind vs Eng 5th Test : बुमराह, पंत आणि शार्दुल बाहेर; पाचव्या कसोटीत कुणाला मिळाली संधी, अशी आहे भारताची प्लेईंग ११

Ind vs Eng Team India Playing XI : भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्याला ओव्हलच्या मैदानात सुरुवात झाली आहे. या सामन्यासाठीच्या भारताच्या प्लेईंग ११ ची घोषणा करण्यात आली आहे.

Yash Shirke

  • भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटीला सुरुवात

  • द ओव्हलमध्ये इंग्लंडने जिंकला टॉस

  • भारतीय संघ पाचव्या कसोटीमध्ये प्रथम फलंदाजी करणार

  • टॉसनंतर भारताच्या प्लेईंग ११ ची घोषणा

India vs England 5th Test : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ मधील शेवटचा आणि पाचवा सामना द ओव्हल येथे सुरु झाला आहे. बेन स्टोक्स हा सामना खेळणार नसल्याने इंग्लंडचे नेतृत्त्व ऑली पोप करणार आहे. मालिकेतील निर्णायक सामन्यामध्ये ऑली पोपने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरणार आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघाने त्यांच्या प्लेईंग ११ ची घोषणा केली होती. आज टॉसनंतर भारताच्या ११ शिलेदारांची घोषणा करण्यात आली.

भारताची प्लेईंग ११ -

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

इंग्लंडची प्लेईंग ११ -

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप ( कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेसब बेथेल, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग

इंग्लंडच्या संघामध्ये चार बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स यांना प्लेईंग ११ मधून वगळण्यात आले आहे. बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीमध्ये इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऑली पोपकडे सोपवण्यात आली आहे.

दुसऱ्या बाजूला भारतीय संघामध्येही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघामध्ये तीन बदल झाल्याचे शुभमन गिलने सांगितले आहे. रिषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल, जसप्रीत बुमराहच्या जागी प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूरच्या जागी करुण नायरला प्लेईंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मालिकेमध्ये कुलदीप यादव, अभिमन्यु ईश्वरन आणि अर्शदीप सिंह यांना एकही सामन्यामध्ये खेळवण्यात आलेले नाही.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये आतापर्यंत भारताचा कर्णधार शुभमन गिलला एकदाही टॉस जिंकता आलेला नाही. त्याने पाचही सामन्यांमध्ये टॉस गमावला आहे. यासोबतच भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागोपाठ पंधरा टॉस गमावण्याचा विक्रम केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT