ind vs eng 5th test day 3 live r ashwin took 4 wickets team india are in strong position  twitter
Sports

IND vs ENG 5th Test, Day 3: आर अश्विनच्या फिरकीवर इंग्लंडच्या फलंदाजांचा नागिन डान्स! लंचपर्यंत निम्मा संघ तंबूत

India vs England 5th Test, Day 3 Highlights: धरमशालेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे

Ankush Dhavre

India vs England 5th Test, Day 3 Highlights:

धरमशालेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. फलंदाजांनी दुसरा डाव गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी गोलंदाजांनीही संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारतीय संघाने इंग्लंडच्या ५ फलंदाजांना तंबूत धाडलं आहे.

भारतीय संघाचा पहिला डाव ४७७ धावांवर संपुष्टात आला. यासह भारतीय संघाने या डावात २५९ धावांची आघाडी घेतली. या आघाडीचा पाठलाग करताना इंग्लंडला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. आर अश्विनच्या गोलंदाजीवर इंग्लंडचे फलंदाज नागिन डान्स करताना दिसून आले आहेत. तिसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत १०३ धावांवर इंग्लंडचे ५ फलंदाज माघारी परतले आहेत. भारतीय संघाकडून आर अश्विनने सर्वाधिक ४ गडी बाद केले आहेत. तर कुलदीप यादवने १ गडी बाद केला.

आपला १०० वा सामना खेळत असलेल्या आर अश्विनने डकेटची दांडी गुल करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. डकेट अवघ्या २ धावा करत माघारी परतला. त्यानंतर त्याने झॅक क्रॉलीला शून्यावर बाद करत माघारी धाडलं. पोप आणि जो रुट या दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली होती. मात्र ही भागीदारी तोडत आर अश्विनने पोपला १९ धावांवर बाद केलं. त्यानंतर कुलदीप यादवने जॉनी बेअरस्टोला ३९ धावांवर बाद केलं. लंचपूर्वी अश्विनने बेन स्टोक्सला २ धावांवर बाद करत माघारी धाडलं. (cricket news in marathi)

जेम्स अँडरसनच्या ७०० विकेट्स

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेम्स अँडरसनच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या १५ मिनिटात जेम्स अँडरसनने कुलदीप यादवला बाद केलं. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. तर जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

SCROLL FOR NEXT