team india twitter
Sports

IND vs ENG Records: टीम इंडियाने इतिहास रचला! इंग्लंडविरुद्ध जे कोणालाच नाही जमलं ते भारताने करुन दाखवलं

India vs England 5th T20I Records: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने रेकॉर्डब्रेकिंग धावसंख्या उभारली. यादरम्यान भारताने मोठा रेकॉर्ड मोडून काढला.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत २० षटकअखेर ९ गडी बाद २४७ धावा केल्या. भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक १३५ धावांची खेळी केली. दरम्यान धावांचा डोंगर उभारताच भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे.

भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत ७ चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने ५४ चेंडूत १३५ धावांची खेळी केली. या खेळीसह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

यासह त्याच्याकडे टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा रेकॉर्ड मोडण्याचीही संधी होती. भारताचा माजी टी-२० कर्णधार रोहित शर्मा या यादीत अव्वल स्थानी आहे. रोहितने अवघ्या ३५ चेंडूत टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक पूर्ण केलं होतं.

अभिषेक शर्माला हा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. मात्र त्याने ३७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यासह तो सर्वात वेगवान शतक पूर्ण करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा, तर भारताचा दुसराच फलंदाज ठरला आहे.

भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या

२९७-६ विरुद्ध बांगलादेश, २०२४

२८३ -१ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२४

२४७-९ विरुद्ध इंग्लंड, २०२५

भारतीय संघाने या सामन्यात फलंदाजी करताना धावांसह रेकॉर्ड्सचाही पाऊस पाडला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमधील तिसरा सर्वाच्च स्कोअर उभारला आहे. यापूर्वी कुठल्याही संघाला इंग्लंडविरुद्ध खेळताना इतका मोठा स्कोअर करता आला नव्हता.

पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या

९५-१ विरुद्ध इंग्लंड, २०२५

८२-२ विरुद्ध स्कॉटलँड, २०२१

८२-१ विरुद्ध बांग्लादेश, २०२४

७८-२ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात

Shravan Shanivar: श्रावणात शनिवारी अवश्य करा हे 3 उपाय, शनिदेव होतील प्रसन्न

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या पैशांवर पुरुषांचा 'डल्ला'! 14 हजार पुरुषांनी लाटले 21 कोटी| VIDEO

दलित तरुणाला विवस्त्र करत बेदम मारहाण, खामगावात संतापजनक प्रकार

Bhoplyachi Puri Recipe : श्रावण स्पेशल डिश, गावाकडे बनवतात तशी खुसखुशीत भोपळ्याची पुरी

SCROLL FOR NEXT