रांची कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघासमोर १९२ धावांचं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ४० धावा केल्या आहेत. सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल १६ तर रोहित शर्मा २४ धावा करत नाबाद आहेत. या डावात २० धावा करताच कर्णधार रोहित शर्माच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Rohit Sharma Record News)
रांची कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघासमोर १९२ धावांचं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ४० धावा केल्या आहेत. सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल १६ तर रोहित शर्मा २४ धावा करत नाबाद आहेत. या डावात २० धावा करताच कर्णधार रोहित शर्माच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
रोहितच्या ४ हजार धावा पूर्ण..
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा कारनामा करून दाखवला आहे. त्याने कसोटीत ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने हा कारनामा ५८ व्या कसोटीतील १०० व्या डावात करून दाखवला आहे. वनडेत चमकदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माची बॅट कसोटीतही चांगलीच तळपते. त्याने ५८ कसोटी सामन्यातील १०० डावात ४४.९९ च्या सरासरीने ४००४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ११ शतकं झळकावली आहेत. तर १६ अर्धशतकं झळकावली आहेत. दरम्यान त्याने १ दुहेरी शतकी खेळी देखील केली आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याने ४३८ चौकार आणि ८० षटकार मारले आहेत. (Cricket news marathi)
असा राहिला आहे रेकॉर्ड...
रोहित शर्माच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २६२ सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्यान त्याने ९१.९७ च्या स्ट्राइक रेटने आणि ४९.१२ च्या सरासरीने १०,७०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३१ शतकं झळकावली आहेत. तर ५५ अर्धशतकं झळकावली आहेत. वनडे क्रिकेटच्या इतिहासात रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे ज्याने ३ दुहेरी शतकं झळकावली आहेत.
रोहितच्या टी -२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने,१५१ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३१.२९ च्या सरासरीने ३९७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतकं आणि २९ अर्धशतकं झळकावली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.