shubman gill ind vs eng x
Sports

Ind vs Eng : मँचेस्टरमध्ये भारताचा पराभव कसा टळला? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितला टर्निंग पॉइंट

Ind vs Eng 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिलने कसोटीतील टर्निंग पॉइंट सांगितला.

Yash Shirke

  • भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळला गेला.

  • हा सामना अनिर्णित राहिला, भारताच्या खेळाडूंनी शर्थीचे प्रयत्न करत संघाला पराभवापासून वाचवले.

  • या सामन्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिलने सामन्यातील टर्निंग पॉइंट सांगितला.

India vs England : मँचेस्टर कसोटीमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंडच्या संघाला भारतीय खेळाडूंनी कसोटी सामना ड्रॉ करण्यास भाग पाडले. पहिल्या डावात इंग्लंडने ३११ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला भारताने दोन विकेट गमावल्या. त्यानंतर शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी शतकीय खेळी करत संघाला पराभवापासून वाचवले. यामुळे भारताला मालिकेमध्ये बरोबरी साधण्याची संधी मिळाली आहे.

मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर शुभमन गिलने बीसीसीआय टीव्हीला मुलाखत दिली. १४० षटकांसाठी एकाच मानसिकतेने खेळणे आव्हानात्मक होते. शून्य धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर माझ्या आणि केएल, आमच्या भागीदारीमुळे आशा निर्माण झाली की आपण हे काम करु शकतो. मी खूप आनंदी आहे. काल ज्या स्थितीत आम्ही होतो, तेथून सामना ड्रॉ करणे हे खूपच समाधानकारक आहे, असे शुबमन गिल म्हणाला. राहुलने संयम, एकाग्रता दाखवत ९० धावा केल्या, केएल राहुलने गिलसोबत तिसऱ्या विकेटसाटी १८८ धावांची भागीदारी केली.

'माझी ही सर्वात समाधानकारक खेळी होती. संयमी खेळीमुळे आम्ही सामना ड्रॉ करु शकलो', असे शुभमन गिल म्हणाला. या मालिकेमध्ये गिलने तब्बल चौथ्यांदा शतकीय कामगिरी केली आहे. सामन्यादरम्यान रिषभ पंत दुखापतग्रस्त झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी खेळ सावरला. 'जेव्हा जड्डू भाई आणि वॉशि फलंदाजी करत होते, तेव्हा चेंडू थोडा हलत होता. पण त्यांनी ज्या संयमाने फलंदाजी केली. त्यावरुन हे किती मोठे यश आहे हे समजते. सुंदरसाठी ही खेळी खूप खास होती. हे त्याचे पहिले कसोटी शतक आहे. संघाला सर्वात जास्त गरज असताना त्याने शतक केले', असे वक्तव्य गिलने केले.

रवींद्र जडेजासह वॉशिंग्टन सुंदरनेही मँचेस्टर कसोटीमध्ये शतक पूर्ण केले. वॉशिंग्टन सुंदरने त्याचे हे शतक त्याच्या कुटुंबाला समर्पित केले. 'जडेजासारखा अनुभवी फलंदाज क्रीजवर असणे फायदेशीर होते. त्याने उत्तम फलंदाजी केली. आम्हाला चेंडू काळजीपूर्वक खेळायचा होता. अशा परिस्थितीत सामना अनिर्णित ठेवणे खूप खास होते, असे वॉशिंग्टन सुंदर म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा संदर्भातील आरक्षणाचा प्रश्नाचे उत्तर शिंदेंच देतील - राज ठाकरे

Guava For Health : प्रत्येक महिलेने खायला हवे हे एक फळ, त्वचा तर चमकदार होईलच रोगप्रतिकार शक्तीही वाढेल

Maharashtra Live News Update: मला जिल्हा परिषद अध्यक्ष करा - हर्षवर्धन सपकाळ

Railway Decision: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Shrirampur Crime : हातात बंदुका घेऊन पाठलाग; श्रीरामपुरमध्ये टोळी युद्धाची भीती, घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT