jasprit bumrah twitter
क्रीडा

IND vs ENG 4th Test: चौथ्या कसोटीत कोण घेणार Jasprit Bumrah ची जागा? हे आहेत ४ पर्याय

Jasprit Bumrah Replacement: चौथ्या कसोटीत कोणता गोलंदाज घेऊ शकतो जसप्रीत बुमराहची जागा? जाणून घ्या कोण आहेत पर्यायी गोलंदाज.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah Replacement:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना येत्या २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघातून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला वगळण्यात आलं आहे.

सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली आहे. तो या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर होणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान चौथ्या कसोटीत कोणता गोलंदाज घेऊ शकतो जसप्रीत बुमराहची जागा? जाणून घ्या. (Jasprit Bumrah Replacement)

हे ४ गोलंदाज आहेत प्रबळ दावेदार..

चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह बाहेर होताच मुकेश कुमारचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला रणजी सामना खेळण्यासाठी रिलीज करण्यात आलं होतं.

त्याने बंगालविरुद्ध झालेल्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत १० गडी बाद केले. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. तसेच इंडिया ए संघाकडून खेळताना लक्षवेधी कामगिरी करणारा आकाश दीपही भारतीय संघात पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत त्याला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

रांचीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. जर भारतीय संघ १ वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरणार असेल तर मोहम्मद सिराज प्लेइंग ११ मध्ये खेळताना दिसून येईल. तर फिरकी गोलंदाज म्हणून वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलपैकी एकाला संघात स्थान दिले जाऊ शकते. (Cricket news marathi)

बुमराहला चौथ्या कसोटीतून बाहेर करण्यात आलं आहे. तो पाचव्या कसोटीत कमबॅक करणार की नाही याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. माध्यमातील वृत्तांमध्ये असं म्हटलं जात आहे की, चौथ्या सामन्याचा निकाल काहीही असो, बुमराहला पाचव्या कसोटीतून विश्रांती दिली जाऊ शकते.

मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT