राजकोटच्या मैदानावर रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली आहे. या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी रोहित शर्माने आपलं शतक पूर्ण केलं आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ११ वं शतक ठरलं आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील हे त्याचं ८ वं शतक आहे. इतर कुठल्याही फलंदाजाला ४ पेक्षा अधिक शतकं झळकावता आलेली नाहीत.
रोहितचं खास शतक....
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी पूर्णपणे चूकीचा ठरवला. इंग्लिश गोलंदाजांनी सुरुवातीला भारतीय संघाला ३ मोठे धक्के दिले.
यशस्वी जयस्वाल अवघ्या १०, रजत पाटीदार अवघ्या ५ आणि शुभमन गिल शून्यावर बाद होऊन माघारी परतला. सुरुवातीचे ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर पाचव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा फलंदाजी करण्यासाठी आला, रोहिच आणि जडेजाने संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाची धावसंख्या २०० पार पोहचवली. दरम्यान वैयक्तिक ११ वं शतक पूर्ण केलं .(Cricket news in marathi)
मोठ्या रेकॉर्डमध्ये सौरव गांगुलीला सोडलं मागे..
रोहित शर्मा आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत त्याने सौरव गांगुलीला मागे सोडलं आहे. या डावातील ८० धावा करताच त्याने १८५७७ धावा पूर्ण केल्या आहेत. तर माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी आपल्या कारकिर्दीत १८५७५ धावा केल्या होत्या. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानी आहे. सचिनने ३४३५७ धावा केल्या आहेत.
आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
सचिन तेंडुलकर - ३४३५७
विराट कोहली - २६७३३
राहुल द्रविड- २४२०८
रोहित शर्मा- १८५७७*
सौरव गांगुली- १८५७५
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.