Ind Vs Eng 3rd Test Saam Tv
Sports

Ind Vs Eng 3rd Test : रिषभ पंत पाठोपाठ केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदरही तंबूत; लॉर्ड्सचा कसोटी सामना भारताच्या हातून निसटला?

India Vs England Lords Test : लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना सध्या सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडने भारताला तीन धक्के दिले आहेत.

Yash Shirke

Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाचवा आणि निर्णायक दिवस सुरु आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताने रिषभ पंत आणि केएल राहुल अशा दोन विकेट्स गमावल्या आहेत. केएल राहुलच्या विकेटनंतर लगेच वॉशिंग्टन सुंदरदेखील बाद झाला. सलग तीन धक्के मिळाल्याने भारतीय संघ आणि चाहत्याचे टेन्शन वाढले आहे. सध्या सामना इंग्लंडच्या बाजूने फिरला आहे. भारताला जिंकण्यासाठी चांगली भागीदारी आवश्यक आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या शेवटी ५८/४ अशी भारताची स्थिती होती. त्यानंतर रिषभ पंत आणि केएल राहुल फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. दोघांकडून भागीदारीची अपेक्षा होती. पण डाव सुरु झाल्यानंतर तिसऱ्याच ओव्हरमध्ये रिषभ पंतची विकेट पडली. त्याला जोफ्रा आर्चरने २० ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर क्लीनबोल्ड केले. त्यानंतर रवींद्र जडेजा खेळण्यासाठी आला.

रिषभ पंतने फक्त ९ धावा केल्या. पंत बाद होऊन माघारी परतल्यानंतर २३ व्या ओव्हरमध्ये केएल राहुल एलबीडब्लू आउट झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने संयमी आणि अनुभवी केएलला बाद केले. केएल राहुलने ५८ चेंडूत ३९ धावा केल्या. भारताला सामना जिंकण्यासाठी केएल राहुलचे मैदानावर टिकून राहणे आवश्यक होते. राहुलच्या विकेटने भारताला मोठा धक्का बसला.

२३ व्या ओव्हरमध्ये केएल राहुल माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आला. लगेच २४ व्या ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदर शून्यावर बाद झाला. जोफ्रा आर्चरने सुंदर झेल घेत वॉशिंग्टनची विकेट मिळवली. सलग तीन महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्याने भारताचे टेन्शन वाढले आहे. दिवसाच्या सुरुवातीला सामना भारताच्या बाजूने असल्याचे म्हटले जात होते. पण पहिल्या सत्रात ३ विकेट्स मिळवत इंग्लंडने सामना फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने सुरुवातीला फलंदाजी करताना ३८७ धावा केल्या. त्यानंतर भारताच्या खेळाडूंनीही ३८७ धावा केल्या. संधी असतानाही भारताला धावांची आघाडी मिळवता आली नाही. दुसऱ्या डावामध्ये भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला १९२ धावांवर रोखले. आता भारतासमोर जिंकण्यासाठी १९३ धावांचे लक्ष्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Maharashtra Live News Update: ST प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

SCROLL FOR NEXT