Ravindra Jadeja x
Sports

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

Ind Vs Eng 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यामध्ये सर रवींद्र जडेजाने शानदार कामगिरी केली. लॉर्ड्सच्या मैदानावर जडेजाने अर्धशतकीय खेळी केली. पण त्याची एकाकी झुंज व्यर्थ ठरली.

Yash Shirke

Ravindra Jadeja Ind Vs Eng : रवींद्र जडेजाने भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीमध्ये शानदार कामगिरी केली आहे. एका बाजूला विकेट्स पडत असताना जडेजाने संयम दाखवला. त्याने सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी केली. १८१ चेंडूंवर ६१ धावांची जबरदस्ती खेळी केली. त्याने भारताला सामना जिंकवूनच दिला होता. पण दुसऱ्या फलंदाजांची साथ न मिळाल्याने भारताने सामना गमावला आणि रवींद्र जडेजाची खेळी व्यर्थ ठरली.

भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला केएल राहुल आणि रिषभ पंत ही जोडी मैदानात उतरली. रिषभ पंत लवकर क्लीनबोल्ड होऊन माघारी परतला. त्यानंतर अवघ्या काही ओव्हर्सनंतर केएल राहुल एलबीडब्लू आउट झाला. त्याच्यापाठोपाठ दुसऱ्याच ओव्हरमध्ये शून्यावर वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. अशा प्रकारे सुरुवातीलाच भारताला सलग ३ धक्के मिळाले.

रिषभ पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने सुरुवातीला नितीश कुमार रेड्डीच्या साथ खेळ पुढे नेला. पहिल्या सत्राच्या शेवटी नितीश कुमार रेड्डीची विकेट पडली. तो १३ धावांवर बाद झाला. रेड्डीनंतर जसप्रीत बुमराहसह रवींद्र जडेजाने फलंदाजीचा भार सांभाळला. दुसऱ्या सत्रात दोघे टिकून खेळले. पण शॉर्ट मारण्याच्या नादात जसप्रीत बुमराह कॅचआउट होऊन माघारी गेला. एकूणच संपूर्ण दिवसभरात रवींद्र जडेजा प्रसंग आणि परिस्थिती ओळखून खेळला. इंग्लंडने जडेजाला बाद करण्यासाठी स्लेजिंग केली. त्याच्यासाठी गोलंदाजीत बदल केला. खास जडेजासाठी जो रूट आणि शोएब बशीरला पुन्हा गोलंदाजीसाठी बोलवण्यात आले.

रवींद्र जडेजाची लॉर्ड्सच्या मैदानावरील खेळी कायम चाहत्यांच्या आठवणीत राहील. एका बाजूला लागोपाठ फलंदाज बाद होत असताना जडेजाने दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा आहे. त्याने भारताला सामना जिंकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. भारत विरुद्ध इंग्लंड मालिका सुरु होण्यापूर्वी रवींद्र जडेजाला खेळवण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सर्व प्रश्नांना जडेजाने त्याच्या खेळाने उत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यावर 'गद्दारी' होत नाही का? संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

Today Gold Rate: रक्षाबंधनाआधी सोनं महागलं, १० तोळ्यामागे ७६०० रुपयांची वाढ; आजचे दर किती?

माधुरी कोल्हापूरात परतणार! अखेर वादावर पडदा, अंबानींनीच काढला तोडगा

Jalgaon News: 'माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका...', गर्लफ्रेंडने दिला धोका, तरुणाने सोशल मीडियावर VIDEO टाकत संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT