Mohammed Siraj Crying x
Sports

Mohammed Siraj : चेंडू बॅटला लागून स्टंपवर आदळला, इंग्लंडला शेवटची विकेट मिळाली अन् सिराजला मैदानावरच रडूच कोसळलं

India Vs England 3rd Test : लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला. शेवटच्या विकेटसाठी मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेचा खेळत असताना अचानक सिराजची विकेट पडली आणि सामना इंग्लंडने जिंकला.

Yash Shirke

Mohammed Siraj Crying After His Wicket : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आहे. अटीतटीचा सामना इंग्लंडने जिंकला आहे. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा शेवटच्या विकेटसाठी फलंदाजी करत होते. तेवढ्यात ७४ व्या ओव्हरमध्ये शोएब बशीरच्या चेंडूवर मोहम्मद सिराजची विकेट पडली. विकेट पडल्यानंतर मोहम्मद सिराजला रडू कोसळले.

७४ व्या ओव्हरची सुरुवात रवींद्र जडेजाने केली. दोन डॉट चेंडू खेळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जडेजाने स्ट्राईक मोहम्मद सिराजकडे दिली. चौथा चेंडू सिराजने खेळून काढला. पाचव्या चेंडूवर त्याची विकेट पडली. सिराजने चेंडू डिफेट केला, सुरुवातीला तो खाली गेला पण त्यानंतर तो मागे जाऊन थेट स्टंप्सवर जाऊन आदळला. शेवटच्या विकेटसाठी सिराज आणि जडेजा झुंज देत होते. पण प्रयत्न करुनही बिचारा सिराज अनलकी ठरला. सामना संपल्यानंतर क्रीजवरच त्याला रडू कोसळले. बेन स्टोक्सने सिराजला मिठ्ठी मारली. इंग्लंडच्या इतर खेळाडूंनी त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

पहिल्या सत्रात इंग्लंड आणि भारत दोन्ही संघांनी समान धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात १९२ धावा केल्या होत्या. भारतासमोर १९३ धावांचे लक्ष्य होते. चौथ्या दिवसाच्या शेवटी भारताने चार विकेट्स गमावल्या होत्या. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, करुण नायर असे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या गोलंदाजांनी बाद केले होते.

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला रिषभ पंत बाद झाला. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरचीही विकेट पडली. एका बाजूने रवींद्र जडेजा झुंज देत होता. त्याला आधी नितीश कुमार रेड्डी, नंतर जसप्रीत बुमराह आणि सामन्याच्या शेवटपर्यंत मोहम्मद सिराजची साथ मिळाली. सामना संपेपर्यंत रवींद्र जडेजा नाबाद खेळत होता. त्याने अर्धशतकीय खेळी करत भारताचे जिंकण्याचे स्वप्न जिवंत ठेवले होते. पण सिराजची विकेट पडली आणि त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: नाशिक गुजरात महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

SCROLL FOR NEXT