
Ravindra Jadeja Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस सुरु आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने ४ विकेट्स गमावल्या. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजा एकटाच खिंड सांभाळून खेळत आहे. या सामन्यात रवींद्र जडेजाने मारलेल्या शानदार षटकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दुसऱ्या सत्रात ४७ व्या ओव्हरमध्ये ख्रिस वोक्स गोलंदाजी करण्यासाठी आला. तिसरा चेंडू टाकल्यानंतर ख्रिस वोक्सने रवींद्र जडेजासाठी एलबीडब्लू आउटचे अपील केले. अंपायरने जडेजा आउट असल्याचे घोषित केले. काही सेकंदांसाठी भारतीय संघ आणि चाहत्यांचा श्वास रोखला गेला. जडेजाने डीआरएसची मागणी केली. डीआरएस रिप्लेमध्ये जडेजा नॉट आउट असल्याचे पाहायला मिळाले.
तिसऱ्या चेंडूच्या वेळी झालेल्या गोंधळानंतर पुढे चौथ्या चेंडूवर रवींद्र जडेजाने पुढे येत जोरदार षटकार मारला. या डावातला भारताचा हा पहिला षटकार आहे. जडेजाच्या षटकाराने स्टेडियमवरील चाहत्यांनी जल्लोष केला. भारतासाठी रवींद्र जडेजा झुंज देत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या डावात नितीशकुमार रेड्डीने जडेजाला साथ दिली. त्यानंतर आता दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह जडेजासोबत फलंदाजी करत आहे.
लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या सुरुवातीच्या डावात इंग्लंड आणि भारत दोन्ही संघांनी समान ३८७ धावा केल्या. चौथ्या दिवशी लॉर्ड्समधील खेळपट्टीमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. याचा फायदा सुरुवातीला भारताच्या गोलंदाजांना आणि नंतर खासकरुन चौथ्या आणि पाचव्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांना झाल्याचे पाहायला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.