joe root catch video twitter
Sports

Joe Root- Jasprit Bumrah: नॉर्मल वाटलोय का? बुमराहच्या रॉकेट बॉलवर रुटचा रिव्हर्स स्कुप खेळण्याचा प्रयत्न, अन् -Video

India vs England 3rd Test: इंग्लंडचा फलंदाज जो रुट जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्कुप खेळायला गेला. मात्र या नादात त्याला आपली विकेट गमवावी लागली आहे

Ankush Dhavre

Joe Root-Jasprit Bumrah Video:

राजकोट कसोटीतील दुसऱ्या दिवशी बेन डकेटच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने सामन्यावर मजबूत पकड बनवली होती. मात्र तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला मोठे धक्के दिले आहेत.

इंग्लंडचा फलंदाज जो रुट जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्कुप खेळायला गेला. मात्र या नादात त्याला आपली विकेट गमवावी लागली आहे. यशस्वी जयस्वालने भन्नाट झेल टिपत त्याला माघारी धाडलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना जसप्रीत बुमराह ४० वे षटक टाकण्यासाठी मैदानावर आला होता. त्यावेळी जो रुट आणि बेन स्टोक्स खेळपट्टीवर टिकून होते. बुमराहच्या तेज तर्रार गोलंदाजीवर जो रुटने रिव्हर्स स्कुप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न त्याच्यावरच उलटला. स्कुप मारल्यानंतर चेंडू थेट वाऱ्याच्या वेगाने स्लिपमध्ये गेला. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या यशस्वी जयस्वालने चुक न करता भन्नाट झेल टिपला. जे पाहून रुटलाही आश्चर्याचा धक्का बसला. (Cricket news in marathi)

जो रुट या डावात ३१ चेंडूंचा सामना करत १८ धावा करत माघारी परतला. यासह जसप्रीत बुमराहने नवव्यांदा जो रुटला बाद करत माघारी धाडलं आहे. जो रुटला जसप्रीत बुमराहविरुद्ध फलंदाजी करताना पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

तसेच या दौऱ्यावरही त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने या दौऱ्यावरील ५ डावात २९,२,५,१६ आणि १८ धावा केल्या आहेत. तो या मालिकेत फ्लॉप ठरत असला तरीदेखील कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. त्याने १३८ कसोटी सामन्यांमध्ये ४९.५१ च्या सरासरीने ११४८६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३० शतक आणि ६० अर्धशतक झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २५४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT