भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना सध्या सुरु आहे. हा सामना इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये खेळला जात आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने या सामन्यामध्ये शानदार कामगिरी केली आहे. पण यशस्वीचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने शतक ठोकले होते. दुसऱ्या सामन्यामध्ये शतक पूर्ण करण्याआधीच यशस्वी बाद झाला.
यशस्वी जैस्वालने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये १०१ धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या डावात शतक ठोकण्याची संधी यशस्वी जैस्वालकडे होती. तो शतक पूर्ण करेल असे सर्वांना वाटत होते. पण ८७ धावांवर यशस्वीची विकेट पडली. या डावात त्याने तब्बल १३ चौकार मारले.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही भारताची सलामीवीर जोडी मैदानामध्ये उतरली. आठव्या ओव्हरमध्ये केएल राहुल ख्रिस वोक्सच्या उकृष्ट चेंडूवर बाद झाला. चेंडू कधी बॅटला लागून स्टंप्सवर गेला हे राहुलला समजलेच नाही. केएल राहुल फक्त २ धावा करुन माघारी परतला.
राहुलच्या नंतर करुण नायर तिसऱ्या क्रमावर खेळण्यासाठी आला. पहिल्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात न झाल्याने त्याने सावधगिरीने खेळण्याचा प्रयत्न केला. पण ब्रेडन कार्सच्या ओव्हरमध्ये हॅरी ब्रूककडून तो बाद झाला. करुण नायरने ३१ धावा केल्या. एका बाजूने विकेट पडत असताना यशस्वी जैस्वाल परिस्थिती अनुसार खेळत राहिला. पहिल्या सत्रामध्ये यशस्वी जैस्वालने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पहिले सत्र संपेपर्यंत भारताने ९८ धावा केल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.