India vs England 2nd Test Weather Update yandex
क्रीडा

IND vs ENG 2nd Test Weather Update: भारत -इंग्लंड कसोटीत पावसाची शक्यता? वाचा कसं असेल हवामान

India vs England 2nd Test Weather Update: विशाखापट्टनममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND vs ENG 2nd Test, Weather Update:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.यासह इंग्लंडने या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ या मालिकेत २-० ची आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

कसं असेल हवामान?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. या कसोटीतील तिसऱ्या दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द होऊ शकतो. यादरम्यान दिवसाचं तापमान २३ ते ३१ डिग्री सेल्सियस इतकं असेल. तर इतर दिवशी क्रिकेट चाहत्यांना पूर्ण षटकांचा खेळ पाहायला मिळेल. (Cricket news in marathi)

भारतीय संघाचा पराभव..

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातील सुरुवातीच्या ३ दिवशी भारतीय संघाने सामन्यावर पकड बनवून ठेवली होती. भारतीय संघ १९० धावांनी आघाडीवर होता.

इथून भारतीय संघाचा विजय स्पष्ट दिसून येत होता. मात्र दुसऱ्या डावात ओली पोपने १९६ धावांची खेळी करत इंग्लंडला संघात कमबॅक करुन दिलं. दुसऱ्या डावात इंग्लंडने ४०० धावांचा पल्ला गाठला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावांची गरज होची. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव २०२ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाला हा सामना २८ धावांनी गमवावा लागला आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार ), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, सरफराज खान, केएस भरत, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT