India Vs England 2nd Test  x
Sports

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

India Vs England Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टनमध्ये सुरु आहे. या सामन्याचा आज शेवटचा आणि निर्णायक दिवस आहे. पावसामुळे सामना सुरु व्हायला उशीर झाला आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन स्टेडियमवर रंगला आहे. आज सामन्यातील पाचवा आणि निर्णायक दिवस आहे. पावसामुळे सामना सुरु व्हायला उशीर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सतत पाऊस सुरु राहिला, तर सामना ड्रॉ होऊ शकतो असे म्हटले जात आहे. पावसामुळे गिलसेनेची एजबॅस्टन स्टेडियमवर इतिहास रचण्याची संधी हुकू शकते असे म्हटले जात आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात काल म्हणजेच चौथ्या दिवशी शुभमन गिलने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात भारताने इंग्लंडसमोर ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज मैदानात उतरले. चौथ्या दिवसाच्या शेवटी इंग्लंडने ३ गडी गमावत ७२ धावा केल्या. भारताकडून आकाश दीपने २, तर मोहम्मद सिराजने १ विकेट घेतल्या. पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी भारताला सात बळी घ्यावे लागणार आहे.

भारताने एजबॅस्टन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना १९६९ मध्ये खेळला होता. त्यानंतर आजपर्यंत ५८ वर्षांत भारताला या स्टेडियमवर एकही सामना जिंकलेला नाही. भारताच्या कसोटी संघाने एजबॅस्टनमध्ये एकूण ८ कसोटी सामने खेळले आहेत. यातील ७ सामने भारताने गमावले, तर एक सामना ड्रॉ राहिला. आता इतक्या वर्षांनंतर भारताला एजबॅस्टन स्टेडियमवर विजय मिळवण्याची संधी आहे. पण यात पावसामुळे खोडा होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

पावसामुळे खोडा होणार का?

भारताने इंग्लंडसमोर ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यातील ७२ धावा इंग्लंडच्या शिलेदारांनी केल्या आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी सात विकेट्स घेणे आवश्यक आहे. जर पाऊस पडत राहिला आणि सामना सुरु व्हायला उशीर झाला. तर त्याचा फायदा इंग्लंडला होईल. पावसामुळे सामना ड्रॉ होईल. आज भारताला एजबॅस्टन स्टेडियमवर कसोटी सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे पण ही संधी पावसामुळे हेरावली जाऊ नये असे प्रार्थना चाहते करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha Rituals: पितृपक्षात वाढदिवस साजरा करावा का? शास्त्र काय सांगते

Brain Eating amoeba : सावधान! देशात मेंदू खाणाऱ्या अमिबाचा पुन्हा उद्रेक, केरळमध्ये १९ जणांचा मृत्यू | VIDEO

Maharashtra Live News Update: आयफोन १७ घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी

Mosquito Bite Remedy : डास चावल्यानंतर लगेच काय करावे?

Janaakrosh Morcha : जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न, बच्चू कडू यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT