Ind Vs Eng x
Sports

Ind Vs Eng : टीम इंडियात उलथापालथ! विश्वास ठेवून ज्यांना संधी दिली, त्यांना दुसऱ्या कसोटीतून आउट करणार

Ind Vs Eng 1st Test मध्ये भारताचा दारूण पराभव झाला होता. खराब कामगिरीमुळे भारतीय संघातील काही खेळाडूंना डच्चू मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng Test Series : लीड्स कसोटी सामन्यामध्ये भारताला ५ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर भारताचा संघ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभाग कमकुवत असल्याचे समोर आले आहे. फलंदाजीत काही खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. पण काहींनी पूर्णपणे निराश केले. भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल. पण भारताच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

करुण नायरच्या जागी ध्रुव जुरेल किंवा नितीश कुमार रेड्डी

८ वर्षांनंतर करुण नायर भारताच्या संघात परतला. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात तो शून्यावर, तर दुसऱ्या डावात २० धावांवर बाद झाला. सहाव्या क्रमांकावर खेळताना त्याने निराशा केली आहे. त्याच्या जागी ध्रुव जुरेल किंवा नितीश कुमार रेड्डीला संधी दिली जाऊ शकते. नितीशला संधी दिल्यास एक गोलंदाजीचा पर्याय देखील मिळेल.

शार्दुल ठाकूरच्या जागी कुलदीप यादव

पहिल्या डावात शार्दुल ठाकूरला गोलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. दुसऱ्या डावात त्याने फारशी चांगली गोलंदाजी केली नाही. त्याने फलंदाजीतही योगदान दिले नाही. त्यामुळे त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात यावी असे म्हटले जात आहे. जडेजा आणि कुलदीप यांच्या फिरकी जोडीमुळे भारताला फायदा होऊ शकतो.

प्रसिद्ध कृष्णाच्या जागी अर्शदीप सिंह

प्रसिद्ध कृष्णाने दोन्ही डावात मिळून ५ गडी बाद केले. पण त्याच्या गोलंदाजीमध्ये नियंत्रणाचा अभाव जाणवत होता. कृष्णा गोलंदाजीसाठी तयार नाही आहे असे वाटत होते. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाच्या जागी अर्शदीप सिंहला संधी दिली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. लवकरच अधिकृत ११ शिलेदारांची घोषणा संघ व्यवस्थापनाकडून केली जाईल असे म्हटले जात आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचे संभाव्य ११ शिलेदार

केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

Smartphone Repairing Tips: फोन दुरुस्तीला देताय? तर 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT