India Vs England x
Sports

Ind Vs Eng : जसप्रीत बुमराह आउट, आकाश दीप इन; दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियामध्ये ३ बदल

India Vs England : भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्यात बेन स्टोक्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना एजबॅस्टन स्टेडियमवर सुरु झाला आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng 2nd Test : बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता भारताचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टॉसनंतर लगेचच भारताच्या प्लेईंग ११ ची घोषणा करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या संघाने त्यांच्या ११ शिलेदारांची माहिती दिली होती.

दोन्ही संघांचे ११ शिलेदार :-

इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॅमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

भारताची प्लेईंग इलेव्हन - यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

भारतीय संघामध्ये महत्त्वाचे ३ बदल करण्यात आले आहेत. साई सुदर्शन, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांना प्लेईंग ११ मधून वगळण्यात आले आहे. नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीप यांना संघ व्यवस्थापनाने सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंह हे दोघे कसोटी सामना खेळतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण या दोघांनाही कसोटी सामन्यात प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही.

जोफ्रा आर्चर हा भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला होता. पण काही कारणांस्तव तो घरी गेला होता. काल जोफ्रा आर्चर इंग्लंड संघाकडे परतला होता. त्यामुळे सामन्यापूर्वी इंग्लंडच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात होता. पण इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आम्ही त्याच ११ खेळाडूंसह खेळणार आहोत, असे म्हटले.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये खेळला गेला. या सामन्यात दोन्ही डावात मिळून भारतीय फलंदाजांनी एकूण पाच शतके झळकावली. पण तरीही खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी यामुळे भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडने मालिकेत आघाडी घेतली आहे. इंग्लंडची बरोबरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Puri Tips: पुऱ्या फुगत नाहीत, तळल्यावर लगेच तेलकट अन् चपट्या होतात? 1 पदार्थ वापरा, टम्म फुगतील पूऱ्या

Local Body Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Khandvi Recipe: नाश्त्याला झटपट बनवा गुजराती स्टाईल खांडवी, मिनिटात होईल फस्त

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

SCROLL FOR NEXT