ben stokes catch twitter
Sports

Ben Stokes Catch: एकच नंबर! स्टोक्स २२ मीटर धावला अन् मागे डाईव्ह मारत घेतला भन्नाट झेल; अय्यर पाहतच राहिला

India vs England 2nd Test: अय्यरला बाद करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Ben Stokes Catch To Dismiss Shreyas Iyer:

विशाखापट्टनममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. पहिल्या डावात २७ धावांवर माघारी परतणारा श्रेयस अय्यर दुसऱ्या डावातही स्वस्तात माघारी परतला आहे. दरम्यान त्याला बाद करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

धावत, डाईव्ह मारत टिपला भन्नाट झेल..

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना २८ वे षटक टाकण्यासाठी टॉम हार्टले गोलंदाजीला आला होता. त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यरला बाद करत माघारी धाडलं.

तर झाले असे की, २८ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अय्यरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण चेंडू बॅटची कडा घेत हवेत गेला. या संधीचा बेन स्टोक्सने दोन्ही हातांनी स्वीकार केला. त्याने २२ मीटर धावत मागच्या दिशेने डाईव्ह मारली आणि डोळ्यांना विश्वासच बसणार नाही, असा झेल टिपला. (Cricket news in marathi)

बेन स्टोक्सचा हा झेल पाहून स्वतः श्रेयस अय्यरही शॉक झाला. तो बेन स्टोक्सकडे पाहतच राहिला. त्याने टिपलेल्या या झेलचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. श्रेयस अय्यरला अजूनही सुर गवसलेला नाही. त्याने ५२ चेंडूंचा सामना करत २९ धावा केल्या. तर पहिल्या डावात तो अवघ्या २७ धावा करत माघारी परतला.

यापूर्वी हैदराबाद कसोटीतही तो फ्लॉप ठरला होता. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात तो ३५ तर दुसऱ्या डावात अवघ्या १३ धावा करत माघारी परतला. त्याची हीच कामगिरी यापुढेही सुरू राहिली तर त्याला संघाबाहेर जायला वेळ लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

Marathi Bhasha Vijay Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

SCROLL FOR NEXT